शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! आठ महिन्यांच्या गर्भवतीवर वाघाचा हल्ला; शेतातून नेलं फरफटत; गडचिरोली जिल्ह्यातील प्रकार, गावावर शाेककळा

By गेापाल लाजुरकर | Updated: December 6, 2024 22:41 IST

कुरखेडातील घटना, शारदा महेश मानकर असे २४ वर्षीय महिलेचे नाव

गाेपाल लाजूरकर, गडचिराेली: दाेन जीवाची बाई. घरातील कामे उरकून शेतातील खळ्यावरचे धान गाेळा करण्याकरिता अन्य तीन महिलांसमवेत शेतात गेली. चारही महिला आपापल्या शेतातल्या खळ्यावरील धान गाेळा करत हाेत्या. यापैकीच गर्भवती शारदासुद्धा जंगलालगतच्या शेतात धान गाेळा करत असतानाच वाघाने हल्ला करीत जंगलाच्या दिशेने फरफटत नेले. वाघाच्या या हल्ल्यात त्या महिलेचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गडचिराेली तालुक्याच्या कुरखेडा (सावरगाव) येथे शुक्रवार, ६ डिसेंबर राेजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

शारदा महेश मानकर (२४) रा. कुरखेडा, ता. गडचिराेली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. जिल्ह्यात धान बांधणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत, तर मळणीची कामे सुरू झालेली आहेत. कुरखेडा येथील महेश मानकर हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या शेतातील धानाची मळणी दाेन दिवसांपूर्वी थ्रेशर मशीनद्वारे झाली. साेबतच परिसराच्या शेतकऱ्यांनीसुद्धा मळणी केली हाेती. मळणी केल्यानंतर धान गंजीवरील व परिसरात पसरलेले धान गाेळा करण्यासाठी शारदा मानकर व अन्य तीन महिला आपापल्या शेतात सकाळी ११ वाजेच्या सुमारास गेल्या. धान गाेळा करण्याच्या कामात व्यस्त असतानाच जंगलातून वाघ शारदा यांच्या दिशेने आला व त्यांच्यावर हल्ला करून जंगलाच्या दिशेने त्यांना फरफटत नेऊ लागला. याचवेळी परिसराच्या बांध्यांमध्ये असलेल्या महिलांनी शारदा यांची किंचाळी ऐकून आरडाओरड केली. काही वेळाने वाघाने आपला जबडा शैल करून जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र, ताेपर्यंत शारदा यांची प्राणज्याेत मालवली. घटनेची माहिती मिळताच चातगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

तीन वर्षांच्या मुलाचे मातृछत्र हरवले

शारदा व महेश मानकर यांना तीन वर्षांचे एक मूल आहे. आता दुसऱ्यांदा शारदा ह्या ८ महिन्यांच्या गर्भवती हाेत्या. घरातील सर्व कामे करून शेतीकामातही त्या महेश यांना मदत करीत असत. वाघाच्या हल्ल्यात त्या ठार झाल्याने तीन वर्षीय मुलाचे मातृछत्र कायमचे हरपले.

टॅग्स :Tigerवाघpregnant womanगर्भवती महिलाGadchiroliगडचिरोलीDeathमृत्यू