शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकावर तुडतुड्याचा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 01:33 IST

उष्ण व दमट वातावरण धानपिकावरील तुडतुडा किडीसाठी पोषक आहे. सद्य:स्थितीत तुडतुडा किडीचा प्रभाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या आत दिसत असला तरी हवामान बघता या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देवातावरण प्रतिकूल : प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता ; उपाययोजना करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उष्ण व दमट वातावरण धानपिकावरील तुडतुडा किडीसाठी पोषक आहे. सद्य:स्थितीत तुडतुडा किडीचा प्रभाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या आत दिसत असला तरी हवामान बघता या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. प्रती चुड पाच ते दहा तुडतुडे आढळून आल्यास उपाययोजना करावी,असे आवाहन गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.तुडतुडे किडीच्या व्यवस्थापनासाठी सायपरमेट्रिनसारख्या सिंथेटिक पायरीथ्राईडचा वापर करू नये. त्यामुळे तुडतुड्याचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. टेहळणीसाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. चिकट सापळ्यांचा तसेच जैविक कीडनाशकांवर भर देण्यासाठी प्रयत्न करावा. मेटारायझिम अनीसोपली १.१५ टक्के बुक्टी या जैविक बुरशीचा २.५ किलो प्रति हेक्टर वापर करावा. आर्थिक नुकसानीची संकेत पातळी गाठताच इमिडॅक्लोप्रिड १७.८ एसएल २.२ मिली लिटर, ट्रायझेफॉस ४० टक्के प्रवाही १२.५० मिली, इथोफेनफॉक्स १० टक्के प्रवाही १० मिली लिटर, फ्लोनिकॅमिड ५० टक्के ३ ग्रॅम, थायोमिथाक्झाम २५ डब्ल्यूजी २ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तसेच तुडतुडे किडीच्या व्यवस्थापनासाठी सेंद्रीय पध्दतीमध्ये पाच लिटर गोमूत्र, पाच लिटर ताक, (एक पाव मिरची, एक पाव लसन, एक पाव कांदे) ठेचा मिश्रण दोन ते तीन दिवस ठेवून १५ लिटर पंपाला १५० मिली लिटर या प्रमाणात फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती