शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

पारंपरिक लावणीतून थिरकला नृत्याविष्कार

By admin | Updated: March 4, 2017 01:23 IST

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर व त्यांच्या संचाने एकाहून सरस मराठमोळी लावणी सादर करून गडचिरोली येथील रसिक प्रेक्षकांना गुरूवारी मंत्रमुग्ध केले.

सखी मंचतर्फे बहारदार लावणी कार्यक्रम : सुरेखा पुणेकर व संचाने रसिकांना केले मंत्रमुग्ध गडचिरोली : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर व त्यांच्या संचाने एकाहून सरस मराठमोळी लावणी सादर करून गडचिरोली येथील रसिक प्रेक्षकांना गुरूवारी मंत्रमुग्ध केले. औचित्य होते सखी मंचच्या वतीने आरमोरी मार्गावरील परिणिता लॉनमध्ये आयोजित सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणी कार्यक्रमाचे. बहारदार लावणी उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगिता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक प्रमोद पिपरे, पोलीस विभागाच्या जनसंपर्क अधिकारी तेजस्वी पाटील, नगरसेविका वर्षा बट्टे, नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अल्का पोहणकर, अमोल प्रभाकर आखाडे, वृंदा बोमनवार, नलिनी बोरकर, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात लोकमतचे संस्थापक स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी व सखी मंचच्या संस्थापक स्व. ज्योत्सना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्ज्वलनाने झाली. त्यानंतर लावणी कार्यक्रमाला सुरूवात झाली. ‘या रावजी, बसा भावजी’, ‘पिकल्या पानांचा देठ हिरवा’, ‘कारभारी दमान’, ‘झाल्या तिन्ही सांजा’ यासह बहारदार लावण्या सुरेखा पुणेकर व त्यांच्या संचाने सादर केल्या. सामाजिक विषयासह विविधरंगी बहारदार लावण्यांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. लावणी कार्यक्रमाला शहरातील बहुसंख्य महिला व पुरूष रसिकांनी गर्दी केली होती. बहारदार लावणी संपताच टाळ्यांच्या कडकडाटात प्रत्येक लावणीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभत होता. एकूणच, बहारदार लावणी कार्यक्रम हजारो प्रेक्षकांच्या प्रतिसादाने पार पडला. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा रामटेके तर आभार लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका प्रीती मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रश्मी शेखर आखाडे, युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका वर्षा पडघन, बाल विकास मंचच्या जिल्हा संयोजिका किरण पवार, सोनिया बैस, अंजली वैरागडवार, सुनीता तागवान, अर्चना भांडारकर, मंगला बारापात्रे, वंदना दरेकर, उषा भानारकर, पूष्पा पाठक, भारती खोब्रागडे, उज्ज्वला साखरे, रोहिणी मेश्राम, सुनीता उरकुडे, स्वाती पवार, कल्पना लाड, सपना मुलकलवार, अंजली देशमुख, अमोल श्रीकोंडावार, शारदा खंडागडे पुष्पलता देवकुले व अन्य सखींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)