शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दंतेवाडात जहाल माओवादी मुरलीसह तिघांना कंठस्नान ! सुरक्षा दलाला मोठे यश

By संजय तिपाले | Updated: March 25, 2025 19:06 IST

Gadchiroli : मुरली पाच वर्षे होता गडचिरोलीत सक्रिय

संजय तिपाले/गडचिरोली 

गडचिरोली : छत्तीसगडच्या दंतेवाडात २५ मार्च रोजी सुरक्षा जवान व माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी जवानांनी तीन माओवाद्यांना कंठस्नान घातले. यात २५ लाखांचे इनाम असलेला जहाल माओवादी व दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य सोनासाई उर्फ सुधीर उर्फ मुरली उर्फ रामसाई (६२)याचा समावेश आहे. नक्षल चळवळीत पदार्पण केल्यानंतर सुरुवातीला पाच वर्षे तो गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय होता. चकमकीत तो ठार झाल्याने माओवादी चळवळीला जबर हादरा बसला आहे.

दंतेवाडा व बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील गिरसापारा, नेलगोडा, बोडगा व इकेली या भागात काही माओवाद्यांचा वावर असल्याची माहिती मिळाल्यावरुन सुरक्षा दलातील राखीव पोलिस जवान (डीआरजी), स्फोटकविरोधी पथकाने दंतेवाडाचे पोलिस अधीक्षक गौरव राय यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी अभियान हाती घेतले होते. २५ मार्च रोजी सकाळी आठ वाजता गिदम पोलिस ठाण्याच्या हद्दीत अभियानादरम्यान माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरात जवानांनीही गोळ्या झाडल्या. चकमकीत जहाल माओवादी मुरलीसह अन्य दोन माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. अन्य दोन माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. यानंतर परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान केल्याची माहिती दंतेवाडाचे उप पोलिस महानिरीक्षक कमलोचन कश्यप यांनी दिली.

मुरलीचा नक्षल चळवळीतील प्रवास असा...सोनासाई उर्फ मुरली हा मूळचा तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यातील रहिवासी होता. अहेरी दलममध्ये १९९५ ते १९९७ पर्यंत त्याने काम केले, त्यानंतर १९९७ ते १९९९ पर्यंत तो पेरिमिली दलममध्ये सक्रिय होता. पुढे त्याने गडचिरोली जिल्हा सोडला व आपला मुक्काम अबुजमाडमध्ये हलविला. तेथून त्याने हिंसक कारवाया केल्या. सुरुवातीला तो चळवळीत नवीन भरती झालेल्या सदस्यांना प्रशिक्षण देत असे, त्याच दरम्यान त्यास डीव्हीसीएम म्हणून बढती मिळाली. मात्र, एका महिला नक्षल्याच्या तक्रारीनंतर त्यास पदावनत केले. त्यानंतर तो इंद्रावती क्षेत्रात एसीएम म्हणून काम करत राहिला. सध्या तो दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य होता.

मोठा शस्त्रसाठा जप्तघटनास्थळी १२ बोअर रायफल, इंसास रायफल, घातक स्फोटक असा शस्त्रसाठा आढळून आला. याशिवाय दैनंदिन गरजेच्या वस्तूही आढळून आल्या. शस्त्रांसह सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

१००बस्तर परिक्षेत्रात २०२५ मध्ये आतापर्यंत तीन महिन्यांत वेगवेगळ्या चकमकींमध्ये शंभर माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आले.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी