घाेरपडीची शिकार करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:24 AM2021-06-20T04:24:53+5:302021-06-20T04:24:53+5:30

सिराेंचा : जंगलातून घाेरपडीची शिकार करणाऱ्या झिंगानूर येथील तीन आराेपींना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. पाेचा रामा गावडे, धर्मा ...

Three hunters arrested | घाेरपडीची शिकार करणाऱ्या तिघांना अटक

घाेरपडीची शिकार करणाऱ्या तिघांना अटक

Next

सिराेंचा : जंगलातून घाेरपडीची शिकार करणाऱ्या झिंगानूर येथील तीन आराेपींना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.

पाेचा रामा गावडे, धर्मा काेरके मडावी, करपा सडमा गावडे हे तिघे जण गावाजवळच्या जंगलात घाेरपडीची शिकार करीत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे दाेन घाेरपड मृतावस्थेत आढळून आल्या. तसेच दाेन कुऱ्हाड, एक भाला सापडला. जंगलात शिकारीकरिता आल्याची कबुली आराेपींनी दिली. त्यांच्या विराेधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२च्या कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. सिराेंचा न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. ही कारवाई क्षेत्र सहायक एस.ए. कुरेशी, व्ही.एस. मडावी, वनरक्षक डी.पी. जाधव यांच्या पथकाने केली. पुढील तपास झिंगानूरचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.पी. बारसागडे करीत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात घाेरपड बिळातून बाहेर पडतात. घाेरपड ही वन्यजीवाअंतर्गत येत असल्याने घाेरपडीची शिकार करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाेरपडीची शिकार करू नये, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Three hunters arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.