शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत प्रवाहाने तीन अस्वलांची शिकार

By admin | Updated: October 27, 2016 01:38 IST

विद्युत प्रवाह लावून तीन इसमांनी तीन अस्वलांची शिकार केल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील सोनपूर येथील कक्ष क्रमांक २०६ च्या जंगलात

सहकारी संस्था संकटात : ३६ लाखांचे कमिशन थकीतगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळामार्फत सन २०१५-१६ यावर्षात खरीप हंगामात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत एकूण ३४ कोटी ८४ लाख ५० हजार ८३० रूपये किंमतीच्या २ लाख ४७ हजार ५५२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. मात्र या धान खरेदीपोटी सहकारी संस्थांना द्यावयाची कमिशनची रक्कम वर्ष उलटूनही प्रलंबित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोेली अधिनस्त असलेल्या कुरखेडा तालुक्यातील ११ संस्थांनी ११ धान खरेदी केंद्रावरून २०१५-१६ च्या खरीप हंगामात एकूण १० कोटी २७ लाख ३७ हजार रूपये किंमतीच्या ७३ हजार २०३ क्विंटल धानाची खरेदी केली. धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रतिक्विंटल २५ रूपये दिले जातात. मात्र राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाला वर्षभरापासून निधी न दिल्याने सहकारी संस्थांचे लाखो रूपयांचे कमिशन थकीत आहे. कुरखेडा तालुक्यातील ११ संस्थांचे सन २०१५-१६ वर्षातील १० लाख ९८ हजार रूपये प्रलंबित आहेत. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ११ सहकारी संस्थांनी ६ कोटी ६५ लाख ५२ हजार ३८२ रूपये किंमतीच्या ४७ हजार २३९ क्विंटल धानाची खरेदी केली. या धान खरेदीपोटी १० सहकारी संस्थांचे ७० लाख रूपये कमिशनपोटी आदिवासी विकास महामंडळाकडे प्रलंबित आहे. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ८ सहकारी संस्थांनी चालू वर्षात ५ कोटी ५१ लाख २९ हजार ५०५ रूपये किंमतीच्या ३९ हजार क्विंटल धानाची खरेदी केली. या धान खरेदीपोटी ५८ लाख ६ हजार रूपये सहकारी संस्थांचे प्रलंबित आहेत. कोरची उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत १२ सहकारी संस्थांनी चालू वर्षाच्या खरीप हंगामात ९ कोटी ३४ लाख १४ हजार ८३४ रूपये किंमतीच्या ६६ हजार २९७ क्विंटल धानाची खरेदी केली. या धान खरेदीपोटी सदर सहकारी संस्थांचे ९ लाख ९४ हजार ४५९ रूपये कमिशनपोटी आदिवासी विकास महामंडळाकडे प्रलंबित आहेत. राज्य शासन संस्थांच्या कमिशनची रक्कम अदा करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाला अनुदान देत नसल्याने कुरखेडा तालुक्यातील वडेगाव, आंधळी, कढोली, गोठणगाव, सोनसरी, गेवर्धा, पलसगड, देऊळगाव, घाटी, कुरखेडा तसेच आरमोेरी तालुक्यातील अंगारा, देलनवाडी, दवंडी, कुरंडीमाल, मौशिखांब, चांदाळा, पोटेगाव, पिंपळगाव व उराडी या संस्था प्रचंड आर्थिक संकटात सापडल्या आहेत. धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी, रांगी, कारवाफा, मोहली, सुरसुंडी, गट्टा, धानोरा तसेच कोरची तालुक्यातील रामगड, येंगलखेडा, मालेवाडा, पुराडा, खेडेगाव, कोरची, बेतकाठी, मुसेली, बोरी, बेडगाव, ग्यारापत्ती, मर्केकसा आदी सहकारी संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)