शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

खवले मांजर जंगलात पकडून ठेवणाऱ्या तिघांना अटक

By गेापाल लाजुरकर | Updated: July 17, 2023 22:02 IST

दाेघांना न्यायालयीन काेठडी : एकाची झाली सुटका

गाेपाल लाजूरकर, गडचिराेली: वन्यजीव अनुसूची १ मध्ये येत असलेले व अतिशय दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या खवले मांजराला पकडून अवैधरित्या जंगलात बांधून ठेवणाऱ्या तीन आराेपींना वन विभागाने १५ जुलै राेजी अटक केली. सदर आराेपींना न्यायालयात हजर केले असता दाेघांना न्यायालयीन काेठडी झाली तर एकाची सुटका करण्यात आली.

निताई दास, हृदय बाला रा. श्रीनिवासपूर (ता. चामाेर्शी) अशी आरोपींची नावे आहेत. श्रीनिवासपूर येथील निताई गौतम दास (२२) हृदय रेवती बाला (३८) व अन्य एका अल्पवयीन आराेपींने १४ जुलै रोजी वन्यप्राणी खवले मांजर अवैधरित्या पकडून त्याला दोराने बांधून दुचाकी वाहनाने नेत हाेते. परंतु आराेपींना वनाधिकाऱ्यांची कुणकुण लागताच खवले मांजराला वनातच बांधून ठेवले. तसेच खवले मांजर हे जंगलात पळून गेल्याचे वनाधिकाऱ्यांना सांगितले. परंतु वनाधिकाऱ्यांनी स्वस्त न बसता गोपनीय माहिती काढून चामोर्शी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. वाडीघरे, चामोर्शीचे क्षेत्रसहायक ए. व्ही. लिंगमवार, भाडभिडीचे क्षेत्रसहायक व्ही. एस. चांदेकर, जामगिरीचे सिद्धार्थ गोवर्धन, आल्लापल्लीचे बोधनवार आदींच्या पथकाने १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता श्रीनिवासपूर येथून तिन्ही आरोपींना चौकशी करीता ताब्यात घेऊन खवले मांजर पळून गेले. त्या ठिकाणी शोधण्यासाठी नेले असता खवले मांजर घोट-चामोर्शी मार्गावरील श्रीनिवासपूर शिवारात आढळले.आराेपींना १५ दिवसांची काेठडी

खवले मांजर प्रकरणी वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (१),(१६),(ए),(बी),९,३९,५०,५१, नुसार दोन आरोपींना १६ जुलै रोजी चामोर्शी न्यायालयात तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने बाल न्यायालय गडचिरोली येथे हजर केले. पुढील चौकशीसाठी वन कोठडी मागण्यात आली होती; मात्र न्यायालयाने निताई दास व हृदय बाला यांना १५ दिवसाची न्यायालीन कोठडी सुनावली. तर अल्पवयीन आराेपीस जमातीवर सोडण्यात आले.गुप्तधन शाेधणे व काळ्या जादूसाठी हाेताे वापर

खवले मांजर प्राणी हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील अनुसूची_१ मध्ये येताे. हा प्राणी दुर्मीळ प्रजातीचा असून ताे नामशेष होण्याचा मार्गावर असलेल्या प्रजातीमध्ये येताे. सदर वन्य प्राण्याच्या अवयवांची आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी होत असून त्याची किंमत अंदाजे ३० ते ४० लाखांपर्यंत आहे. गुप्तधन शाेधणे तसेच अंधश्रद्धेपाेटी काळी जादू करण्यासाठी त्याचा वापर व व्यापार केला जाताे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी