आॅनलाईन लोकमतगडचिरोली : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करून कर्जमाफी देण्यात यावी, उच्चप्रतीच्या धानाला प्रती क्विंटल २ हजार २०० रूपये भाव देण्यात यावा, तसेच रोगाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी १२ हजार रूपये देण्यात यावे तसेच ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, आदीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.दुपारी २ वाजता इंदिरा गांधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख छाया कुंभारे, अहेरी विभाग जिल्हाप्रमुख विजय शृंगारपवार यांनी केले. दुष्काळ व रोगराईमुळे पिकाचे प्रचंड नुकसान होऊनही पैसेवारी ५० टक्क्यांहून अधिक दाखविण्यात आली. शेतकºयांना भरपाई मिळू नये, यासाठी महसूल विभागाच्या अधिकाºयांनी जाणीवपूर्वक अधिक पैसेवारी दाखवली, असा आरोप सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केला. सत्तेत येताच भाजपने शेतकरी व शेतमजुरांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका त्यांनी केली. आता सरकारला खाली खेचण्याची धमकही शिवसेनेजवळ आहे, असा इशारा छाया कुंभारे यांनी यावेळी दिला.या मोर्चात जि.प.च्या माजी महिला व बालकल्याण सभापती निरांजनी चंदेल, माजी जि.प. सदस्य सुनंदा आतला, उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, वासुदेव शेडमाके, राजू कावळे, अनंत बेझलवार, भरत जोशी, छाया रामगिरवार, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख संतोष मारगोनवार, घनश्याम कोलते, नंदू कुमरे, पप्पी पठाण, विलास ठोंबरे, युवा सेना जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, श्याम धोटे, गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव, माणिक भोयर, कवडू सहारे, डॉ.श्रीकांत बन्सोड, नंदू चावला, आशिष काळे, रमेश मानकर, राजू रामपूरकर, अमित यासलवार, बिरजू गेडाम, कोरेगावचे सरपंच प्रशांत किलनाके, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संजय आकरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक, शेतकरी व शेतमजूर सहभागी झाले होते.मोर्चास प्रारंभ होण्यापूर्वी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, महिला आघाडीप्रमुख छाया कुंभारे, उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम आदींची भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणात सरकारला खडे बोल सुनावले.दुष्काळ व रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना भरीव आर्थिक साहाय्य करावे, अतिक्रमणधारकांना तत्काळ जमिनीचे पट्टे द्यावे, महसूल व वनविभागाने ताब्यात घेतलेल्या अतिक्रमणधारकांच्या जमिनी शेतक?्यांना परत कराव्यात, कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, कुणबी व पेरकी जातींना क्रिमीलेयरमधून वगळण्यात यावे, बंगाली बांधवांना मिळालेल्या जमिनीचे वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रुपांतर करावे, आदिवासी बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबवावे इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय शेतकरी व शेतमजूरही बहुसंख्येने उपस्थित होते.
हजारो शिवसैनिक जिल्हा कचेरीवर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:20 IST
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करून कर्जमाफी देण्यात यावी, उच्चप्रतीच्या धानाला प्रती क्विंटल २ हजार २०० रूपये भाव देण्यात यावा,...
हजारो शिवसैनिक जिल्हा कचेरीवर धडकले
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका;कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करा