शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना समितीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 16:05 IST

कायमसाठी लढा : कस्तुरबा गांधी विद्यालयातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार न्याय ?

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून सेवेत नियमित करण्याच्या प्रतीक्षेत होते. याबाबत विविध कंत्राटी कर्मचारी संघटनांकडून पाठपुरावा सुरू होता. २२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश दिले. मात्र, अजूनपर्यंत समिती स्थापन झाली नाही. अधिकाऱ्यांनी समिती गठीत करून तत्काळ अहवाल तयार करण्यावर काम सुरू करावे, अशी मागणी मावळा संघटनेने केली आहे.

सदर समिती सदरच्या विविध पदांवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीतील एकूण वेतनावर तसेच सेवेत कायम केल्यानंतर विविध स्वरुपात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या वेतनासंबंधी, निर्वाहभत्ता व इतर रकमेच्या अनुषंगाने आवश्यक तरतुदींचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणार आहे.

दरम्यान, राज्यात २००८ पासून निर्मित ४२ कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालयातील चारशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलने व निवेदनाच्या माध्यमातून राज्य सरकारला मागण्या केल्या. मुलींच्या शाळांमधील ८० टक्के कर्मचारी महिला असल्याने राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिला कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून त्यांना पगारवाढ देण्याची मागणी केली आहे.

सर्व कर्मचाऱ्यांचे पगार इतर ठिकाणी समकक्ष पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांएवढे करणे, अर्ध्यापेक्षा जास्त रिक्त असलेल्या जागा तत्काळ भरण्यात याव्यात. आदी मागण्या केल्या आहेत. मुलींचे शिक्षण पूर्ण करण्याकरिता २००६ साली नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये सुरू केली आहेत. राज्यात गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा व इतर ५ तालुक्यांसह पालघर, नंदुरबार, बीड, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, नाशिक या जिल्ह्यातील दुर्गम भागात अशा ४३ शाळा आहेत, या शाळातील मुख्याध्यापकांना पंचवीस हजार, तर इतर कर्मचारी यांना त्यापेक्षा कमी पगार मानधन तत्त्वावर मिळतो. मात्र, ना महागाई भत्ता मिळत, ना वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनवाढ मिळत,अशी परिस्थिती आहे. 

"कस्तुरबा गांधी मुलींच्या निवासी शाळांतील २००८ पासूनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित केल्यास राज्य शासनावर ४ ते ५ कोटी, तर केंद्र शासनावर फक्त ६ ते ७ कोटींचा भार वाढणार आहे. जे अधिकारी मुद्दामहून दिरंगाई करतील, त्यांच्याविरोधात मावळा संघटना विविध प्रकारे मैदानात उतरेल."- राहुलदेव मनवर, मावळा संघटना, उपाध्यक्ष 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली