शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एक हजार घरकुलांच्या कामांना प्रारंभच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:06 IST

सर्वसामान्य व गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी हजारावर घरकूल मंजूर केले जातात.

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना : लाभार्थी व यंत्रणेची उदासीनता

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : सर्वसामान्य व गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी हजारावर घरकूल मंजूर केले जातात. मात्र अनुदान मिळूनही लाभार्थी घरकुलाचे काम करण्यास दिरंगाई करीत आहेत. तसेच यंत्रणेचीही उदासीनता यात दिसून येत असल्याने घरकुलाचे काम चालू वर्षात मंदावले आहे. सन २०१७-१८ या वर्षातील तब्बल १ हजार ३६ घरकुलाच्या कामांना प्रारंभच झाला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण ३ हजार १९६ घरकूल मंजूर करण्यात आले. यामध्ये अहेरी तालुक्यात ५३५, आरमोरी तालुक्यात २३२, भामरागड ५४, चामोर्शी २९९, देसाईगंज १८२, धानोरा १८२, एटापल्ली १२०, गडचिरोली १७८, कोरची १५०, कुरखेडा ४१४, मुलचेरा १८७ व सिरोंचा तालुक्यात ६६३ घरकुलांचा समावेश आहे. मंजूर झालेल्या एकूण घरकुलांपैकी २ हजार १६० घरकूल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली. यामध्ये अहेरी तालुक्यातील २२४ लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले.आरमोरी तालुक्यातील १५१, भामरागड ३०, चामोर्शी २३१, देसाईगंज १४४, धानोरा १११, एटापल्ली ६०, गडचिरोली १५४, कोरची १२३, कुरखेडा ३९५, मुलचेरा १५१ व सिरोंचा तालुक्यातील ३८६ लाभार्थ्यांचा समावेश आहे. अद्यापही २९५ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करणे बाकी आहे.सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील एकही घरकूल अद्यापही पूर्ण झाले नाही. महागडे बांधकाम साहित्य व आर्थिक परिस्थिती हलाखीची व इतर कारणामुळे लाभार्थी घरकुलाचे काम गतीने करताना दिसून येत नाही. संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभार्थ्यांकडे पोहोचून त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेच्या कामाला गडचिरोली जिल्ह्यात अपेक्षित गती अद्यापही मिळाल्याचे दिसून येत नाही.लाभार्थ्यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळवजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने सदर योजनेंतर्गत मंजूर झालेल्या ७५ टक्के लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात अदा करण्यात आली आहे. उर्वरित २५ टक्के लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करावयाची आहे. ही रक्कम मिळावी यासाठी संबंधित लाभार्थी आवश्यक ते कागदपत्र जुळविण्याच्या कामात लागले आहे. काही लाभार्थी बँकांमध्ये खाते उघडत आहेत. बहुतांश लाभार्थ्यांना आवश्यक असलेले कागदपत्र संबंधित विभागाकडून लवकर मिळत नसल्याने अनुदान वाटपाच्या प्रक्रियेत विलंब होत आहे. घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रयत्न करीत आहे.