लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराला आता वेग येत असून केवळ नऊ दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांसह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येक गावात पोहोचण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र दुसरीकडे राजकीय पक्ष व उमेदवारांकडून मतदारांना वस्तूच्या स्वरूपात प्रलोभन देऊन प्रभाव पाडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पारदर्शकपणे ही निवडणूक पार पडावी, यासाठी निवडणूक व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर स्थिर निगराणी कक्ष स्थापन करण्यात आले असून या माध्यमातून आवागमन करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे वाहनांवर २४ तास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नजर आहे.गडचिरोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर २२ सप्टेंबरपासून आदर्श आचारंसहिता लागू झाली. २७ सप्टेंबरपासून नामनिर्देशन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली. ही सर्व प्रक्रिया पार पडली असून आता अधिकृत चिन्ह वाटपानंतर खुल्या प्रचाराला जोरात सुरूवात झाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक व पोलीस विभागाने अवैध धंद्यावर नियंत्रण ठेवण्यास सुरूवात केली. गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील कनेरी फाट्याजवळ तसेच आरमोरी, धानोरा मार्गावरही नाकेबंदी करून आवागमन करणाºया वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.२१ आॅक्टोबर रोजी तिनही विधानसभा मतदार संघात मतदानाची प्रक्रिया घेण्यात येणार असून या निवडणूकीचा निकाल २४ आॅक्टोबरला जाहीर होणार आहे. निकालाच्या दिवसापर्यंत निवडणूक विभागाच्या वतीने जिल्ह्याच्या ठिकठिकाणी प्रमुख मार्गावर लावण्यात आलेले स्थिर निगरानी कक्ष कार्यरत राहणार आहेत.सदर निवडणुकीदरम्यान गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेरून अवैध दारू व इतर अंमली पदार्थ येऊ नयेत, अनधिकृतपणे पैशाची ने-आण होऊ नये, यासाठी पथक सतर्क असून या पथकाची ये-जा करणाºया वाहनावर करडी नजर आहे. निगरानी कक्षाचा तपासणी अहवाल निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविला जात आहे. एकूणच जोरदार नाकाबंदी करण्यात आली असल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून त्यांना आपला व्यवसाय सद्य:स्थितीत बंद ठेवावा लागत आहे.भामरागडातही पोलिसांकडून नाकेबंदीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भामरागड तालुक्यात तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रात अवैधरित्या दारू व पैशाची आयात होऊ नये, कोणत्याही प्रलोभनाशिवाय ही निवडणूक पारदर्शकपणे पार पडावी, असा निवडणूक विभागाचा उद्देश आहे. त्यादृष्टिकोनातून पोलीस विभागाकडून भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ नाकेबंदी करून ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. रात्रंदिवस गस्त सुरू असून प्रत्येक वाहनांची तपासणी होत आहे. भामरागड-आलापल्ली या एकमेव प्रमुख मार्गावर निवडणूक पथक व पोलीस विभागाच्या वतीने वाहनांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.वैनगंगेवरही नाकाचंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलाच्या अलिकडे कनेरी गावाकडे जाणाऱ्या फाट्याजवळ निवडणूक विभागाचे निगरानी कक्ष आहे. येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ड्यूट्या लावण्यात आल्या आहेत. निवडणूक व पोलीस विभागाचे कर्मचारी येथे २४ तास पाहारा देत आहे. चंद्रपूरवरून गडचिरोलीकडे व गडचिरोलीकडून चंद्रपूरकडे जाणाºया दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनांना थांबवून तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे ये-जा करणाºया वाहनांचा नंबर, चालकाचे नाव आदींची नोंदणी रजिस्टरमध्ये केली जात आहे. याशिवाय चारचाकी वाहनांच्या आतमध्ये संपूर्ण पाहणी केली जात आहे. वाहनाच्या क्रमांकासह वाहनाच्या आत असलेल्या सामान व इतर बाबींचे चित्रीकरण केले जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या तसेच ट्रॅव्हल्सची तपासणी बारकाईने केली जात आहे.
आवागमन करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST
गडचिरोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर २२ सप्टेंबरपासून आदर्श आचारंसहिता लागू झाली. २७ सप्टेंबरपासून नामनिर्देशन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली. ही सर्व प्रक्रिया पार पडली असून आता अधिकृत चिन्ह वाटपानंतर खुल्या प्रचाराला जोरात सुरूवात झाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक व पोलीस विभागाने अवैध धंद्यावर नियंत्रण ठेवण्यास सुरूवात केली.
आवागमन करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी
ठळक मुद्दे२४ तास पथकाची नजर : नोंदीसह केले जातेय चित्रीकरण; मुख्य मार्गावर निवडणूक विभागाने बसविले आहेत चौक्या