शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
3
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
4
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
5
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
6
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
7
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
8
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
9
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
10
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
11
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
12
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
13
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
14
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
16
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
17
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
18
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
19
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
20
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

जिल्हाभर नवागतांच्या स्वागताने यावर्षीच्या शालेय सत्राला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 05:00 IST

शाळेच्या प्रवेशद्वारावर रंगरंगाेटी, फुलझाडे, फुगे व इतर साहित्यांनी सजावट करून शाळेला नवीन लूक देण्यात आला. विद्यार्थ्यांनीही नवीन कपडे घालून तसेच काही विद्यार्थी टाेप्या घालून या उत्साहात सहभागी झाले. गावपातळीवरील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व पालकांनी प्रवेशाेत्सव कार्यक्रमाला हजेरी लावून विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा उत्साह द्विगुणित केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : यंदाचे शैक्षणिक सत्र २७ जूनपासून सुरू झाले असले तरी जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळांमध्ये बुधवारपासून (दि. २९) वर्ग भरण्यास सुरुवात झाली. शाळेचा हा पहिलाच दिवस असल्याने पाठ्यपुस्तके, गणवेश, फुगे, पुष्पगुच्छ देऊन शाळेत प्रथमच पाय ठेवणाऱ्या इयत्ता पहिलीतील १५ हजारांवर विद्यार्थ्यांचे जाेरदार स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.बुधवारपासून जि. प. च्या जिल्ह्यातील सर्वच १५१३ तसेच देसाईगंज, आरमोरी आणि गडचिराेली न. प.च्या शाळा सुरू झाल्या. शिक्षण विभागाच्या वतीने नवागतांच्या स्वागतासाठी प्रवेशाेत्सव कार्यक्रमाचे नियाेजन करण्यात आले होते. सर्वच शाळांमध्ये सॅनिटायझर, हॅन्डवाॅश आदी उपलब्ध करून देण्यात आले. या दाेन्ही वस्तूंचा विद्यार्थ्यांनी वापर केला. काही शाळांमधील विद्यार्थी मास्क घालून आल्याचे दिसून आले.

६० हजारांवर विद्यार्थ्यांना दिली पाठ्यपुस्तके

शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वच शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या ६० हजारांवर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. शालेय पाेषण आहाराची अंमलबजावणी पहिल्या दिवशीपासून सुरू करण्यात आली असून, जि. प.च्या सर्वच शाळांमध्ये पहिल्या दिवशी आहार शिजवून ताे विद्यार्थ्यांना देण्यात आला, अशी माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. 

शाळेच्या प्रवेशद्वारावर रंगरंगाेटी, फुलझाडे, फुगे व इतर साहित्यांनी सजावट करून शाळेला नवीन लूक देण्यात आला. विद्यार्थ्यांनीही नवीन कपडे घालून तसेच काही विद्यार्थी टाेप्या घालून या उत्साहात सहभागी झाले. गावपातळीवरील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व पालकांनी प्रवेशाेत्सव कार्यक्रमाला हजेरी लावून विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा उत्साह द्विगुणित केला.

अनेक शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पंगत-    गडचिराेली पंचायत समितीअंतर्गत पाेर्ला, नगरी, साखरा, गाेगाव व इतर शाळांमध्ये पहिल्याच दिवशी शालेय पाेषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना स्वादिष्ट व गाेड जेवण देण्यात आले. विशेष म्हणजे नगरी जि. प. शाळेत विद्यार्थ्यांची भाेजनाची पंगत लावून सामूहिक भाेजन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनीही पाेषण आहाराचा आस्वाद घेतला.

शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली धानाेरातील शाळांना भेट-    जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी ए. एफ. धामने यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी बुधवारला धानाेरा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला भेट देऊन तेथील साेयीसुविधांची पाहणी केली. याशिवाय कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला भेट देऊन तेथील विद्यार्थिनींशी संवाद साधला. -    शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित हाेते. 

 

टॅग्स :Schoolशाळा