शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी जिल्ह्यातील रेशीम टसर शेती अस्मानी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 16:01 IST

हवामान बदलाचा परिणाम : चार महिन्यांचा हिरावणार रोजगार

प्रदीप बोडणे लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड :गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांच्या ज्या भागात येन, अंजनची झाडे आहेत. त्या जंगलात या भागातील ढीवर समाज बांधव परंपरागतरित्या मोठ्या प्रमाणात रेशीम शेती करतात. आता शासनाच्या सुविधेमुळे शेती फायद्याची ठरू लागली असल्याने रेशीम शेतीचे क्षेत्र वाढले आहे. पण, या वर्षात सततच्या ढगाळ वातावरणामुळे रेशीम शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, यंदा टसर शेती अस्मानी संकटात सापडली आहे.

पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील ढीवर समाज बांधव मोठ्या प्रमाणात रेशीम शेती करतात. आरमोरी तालुक्यातील थोटेबोडी, मॅडबोडी, नागरवाई, कुरखेडा तालुक्यांतील कढोली, जांभळी, गांगुली परिसराच्या गावातील ढीवर समाज परंपरागत शेतीचा व्यवसाय करतात. रेशीम शेतीसाठी लागणारे अंडीपुंज पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या आरमोरी येथील रेशीम केंद्रातून आणतात.

रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अंडीपुंज सवलतीच्या दरात विकत मिळतात. ही अंडीपुंज जंगलातील येन किंवा अंजनाच्या झाडावर ठेवून त्यापासून होणारे अंडी कोश तयार करते. या वर्षात अंडीपुंज झाडावर उत्पन्नासाठी टाकल्यापासून वातावरणातील अति उष्णपणा, कधी थंडी या वातावरणातील बदलामुळे अंडीपुंज्यातून अंडी तयार झाल्यानंतर कोश निर्माण करण्यापूर्वी अनेकदा मरून पडल्या आहेत.  या वर्षात कमी कोश निर्माण झाले आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून, यंदाची टसर रेशीम शेती तोट्याची होत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

"या वर्षातील अती पाऊस आणि त्यामुळे टसर शेती उशिरा झाली. त्यानंतर मात्र ऑक्टोबर हिंटने चांगलेच हैराण केले. वातावरणात अतिउष्णपणामुळे, अंडी पुंजाच्या अळ्यांची वाढ झाली नाही. कोश तयार झाले नाही." - तुळशीराम सोनबावणे, शेतकरी, कढोली.

"रेशीम शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला, तरी त्याच्यावर उपाययोजना झाल्यास शेती फायद्याची ठरते. पण, रेशीम टसर महामंडळाकडून आवश्यक द्रावणाचा पुरवठा न झाल्याने अनेक अळ्या मरण पावल्या."- जितेंद्र भोयर, शेतकरी, कढोली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली