शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी ११५ केंद्रांवरून होणार हमी भावाने धानाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 23:10 IST

शासनाच्या निर्देशानुसार आधारभूत किमतीनुसार खरेदी योजना खरीप पणन हंगाम २०२२-२३ साठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. कोणीही शेतकरी यापासून वंचित राहू नये, म्हणून या नोंदणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन ती ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली कार्यालयांतर्गत ५३ तर अहेरी कार्यालयांतर्गत ३८ खरेदी केंद्रांना यावर्षी मंजुरी दिली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक (टिडीसी)च्या प्रादेशिक कार्यालय गडचिरोली आणि उपप्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत एकूण ९१ खरेदी केंद्रांसोबत मार्केटिंग फेडरेशनच्या २३ केंद्रांवरून यावर्षी हमीभावाने धान खरेदी केली जाणार आहे. यातील काही केंद्र सुरू झाले असून येत्या सोमवारपासून बहुतांश केंद्र सुरू होणार आहेत.  शासनाच्या निर्देशानुसार आधारभूत किमतीनुसार खरेदी योजना खरीप पणन हंगाम २०२२-२३ साठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. कोणीही शेतकरी यापासून वंचित राहू नये, म्हणून या नोंदणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन ती ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली कार्यालयांतर्गत ५३ तर अहेरी कार्यालयांतर्गत ३८ खरेदी केंद्रांना यावर्षी मंजुरी दिली आहे. तसेच  राज्य  मार्केटिंग  फेडरेशनच्या २४ केंद्रांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी काही केंद्र सुरू झाले, तर उर्वरित केंद्र  सोमवारपर्यंत  सुरू  होणार आहेत. तथापि, अहेरी उपविभागात धान उशिरा निघत असल्यामुळे त्या भागातील बहुतांश केंद्र दोन आठवड्यात सुरू होतील.

अधिकृत केंद्रावरच विक्री कराधान ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वत: सात- बारा व इतर आवश्यक दस्तावेजासह आपल्या नजिकच्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या खरेदी केंद्राशी, तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधून आपल्या धानाची विक्री करावी आणि शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार आणि अहेरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बी.एस. बरकमकर यांनी केले आहे.

भाडभिडी केंद्रावर शुभारंभ 

घोट : आदिवासी विकास महामंडळाच्या विविध कार्यकारी सहकारी संस्था भाडभिडी (बी) या खरेदी केंद्राचे उद्घाटन घोट येथील  उपप्रादेशिक व्यवस्थापक व्ही.ए. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपसभापती कवडू मन्नोर, कर्मचारी वाय.एन.  कोडापे, संस्थेचे व्यवस्थापक एल.डी. कोपूलवार,  संचालक रा.गा. कोवासे, नागोराव इस्टाम, रुखमाबाई कोवासे, जनार्धन देऊरमले, ना.तु. ठाकूर, सो.न. किरमे, था.पु.फुलझेले, सोमजी गावडे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :market yardमार्केट यार्ड