शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

हलबा जमातीच्या प्रश्नांवर विचारमंथन

By admin | Updated: July 13, 2015 01:49 IST

राष्ट्रीय हलबा जमात महामंडळ व हलबा जमात संघटना गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी येथील...

गडचिरोलीत राष्ट्रीय परिषद : आदिवासी हलबा आरक्षणावरही झाली चर्चागडचिरोली : राष्ट्रीय हलबा जमात महामंडळ व हलबा जमात संघटना गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित सत्यशोधक आदिवासी हलबा आरक्षण परिषदेत हलबा जमातीच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले. हलबा जमातीला आरक्षण व हक्क मिळण्यासाठी संघटितरीत्या एकत्रित येऊन शासनाच्या विरोधात लढा उभारण्याचा एकमुखी निर्णय या परिषदेत घेण्यात आला.हलबा जमातीच्या राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी बी. के. हेडाऊ होते. यावेळी उदय धकाते, राकेश कुंभारे, अभयकुमार धकाते, डॉ. सुशील कोहाड, राकेश देविकर, गजानन सोरते, प्रशांत सिलेकर, सूरज कवाडघरे, दीपक बोकडे, मनोहर धकाते, रवींद्र निमजे, महादेव कुंभारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. देशात वास्तव्यास असलेल्या आदिवासी हलबा जमातीला महाराष्ट्र शासन सापत्न वागणूक देत आहे. या जमातीस शासन अस्पृश्य समजून जात पडताळणीच्या माध्यमातून वाळीत टाकले जात आहे. यामुळे हलबा जमातीचे लोक पूर्णपणे खचले आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या विरोधात तीव्र लढा उभारण्यासाठी रणनिती आखणे गरजेचे आहे. त्यासाठीच या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन परिषदेचे अध्यक्ष बी. के. हेडाऊ यांनी केले. या परिषदेचे प्रास्ताविक हलबा जमात महामंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, संचालन रूपराम निमजे यांनी केले तर आभार राकेश देविकर यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)हे झाले सर्वानुमते निर्णयहलबा समाजाच्या महाराष्ट्रातील आमदारांनी वर्षातून एकदा समाजाची तसेच सर्व समाज संघटनांची एकत्रित बैठक घ्यावी, सदर आमदारावर समाजाच्या हक्कासाठी महामंडळाने दबावगट निर्माण करावा, हलबा जमातीचा अभ्यासगट निर्माण करावा, हलबा जमातीतील कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाजविरोधी कार्य केल्यास त्यांना सामाजिक कार्यापासून दूर करणे, समाजाच्या प्रश्नावर मोर्चा, उपोषण व आंदोलन करणे, आदी निर्णय परिषदेत घेण्यात आले.