शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ बेपत्ता सात युवक-युवती नक्षल चकमकीतच ठार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 17:30 IST

सात युवक-युवती पोलीस-नक्षल चकमकीतच ठार झाल्याची दाट शक्यता समोर येत आहे.

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कसनासूर येथे गेल्या २२ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीपासून बेपत्ता झालेले नक्षल कमांडर साईनाथ याच्या गट्टेपल्ली या गावातील सात युवक-युवती पोलीस-नक्षल चकमकीतच ठार झाल्याची दाट शक्यता समोर येत आहे. ते सर्वजण नक्षल चळवळीशी जुळलेले होते, अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. 

या चकमकीत नक्षल कमांडर साईनाथ हासुद्धा मारल्या गेला. चकमकीनंतर तीन-चार दिवसपर्यंत काही नक्षल्यांचे मृतदेह जंगलात तर काहींचे इंद्रावती नदीत मिळाले होते. त्या चकमकीतील एकूण ३४ जणांपैकी २० जणांची ओळख पटली नाही. त्या ओळख न पटलेल्या मृतदेहांमध्ये गट्टेपल्लीतील बेपत्ता युवक-युवतींचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे.  नक्षल चकमकीपासून गट्टेपल्ली येथील इरपा वृत्ते मडावी (२३), मंगेश बकलू आत्राम (२६), रासो पोचा मडावी (२२), मंगेश चुंडू मडावी (१९), अनिता पेडू गावडे (२१), नुसे पेडू मडावी (२३) हे सहा युवक व युवती बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसात दाखल केली आहे. याशिवाय रासो चुकू मडावी ही १५ वर्षाची अल्पवयीन मुलगीही बेपत्ता आहे. त्यामुळे तिचे अपहरण झाल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यापैकीच एक असलेली बुज्जी करवे उसेंडी (१७) ही युवतीही चकमकीत ठार झाली असून तिची ओळख पटवून पालकांनी त्याच वेळी तिचा मृतदेह ताब्यात घेतला होता. आठपैकी एक युवती नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाली याचा अर्थ बेपत्ता असलेले बाकी सात युवक-युवतीही त्यावेळी नक्षल्यांसोबतच होते व तेसुद्धा त्याच चकमकीत मारले गेले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

विशेष म्हणजे चकमकीनंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या काही साहित्य व डायरीत आठ जणांचे नक्षली पोषाख शिवण्यासाठी माप दिल्याची नोंद आढळली आहे.  यावरून ते सर्वजण नक्षल कमांडर साईनाथच्या सहकार्याने नक्षल चळवळीत रूजू झाले असण्याची शक्यता वाढत असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

डीएनए चाचणीतून होणार स्पष्टचकमकीनंतर ४ ते ५ दिवसानंतर काही मृतदेह इंद्रावती नदीत आढळले. परंतू मास्यांनी त्या मृतदेहांची दुरवस्था केल्याने ते ओळखण्याच्या स्थितीत नव्हते. मात्र त्यांचे डीएनए घेऊन ते बेपत्ता लोकांच्या कुटुंबियांच्या डीएनएशी जुळतात का याची चाचणी घेतली जात आहे. त्यातून चकमकीत ठार झालेले ते अज्ञात व्यक्ती गट्टेपल्लीतील बेपत्ता युवक-युवतीच होते किंवा नाही हे स्पष्ट होईल.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली