शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

ऑनलाईन अध्यापन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

राज्यात कोरोना विषाणूचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्था शासनाच्या निर्देशानुसार बंद आहेत. मात्र शासन निर्देशानुसार शैक्षणिक प्रथम वर्ष सोडून उर्वरित अभ्यासक्रम १ ऑगस्ट पासून प्रथम वर्ष १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. राज्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या लक्षात घेता यात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे.

ठळक मुद्देकोरोनाबाबत खबरदारी : नवीन शैक्षणिक सत्रात ऑनलाईन प्रवेशाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नवीन शैक्षणिक सत्र तोंडावर असताना देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अशास्थितीत नियोजित तारखेनुसार विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता कमी आहे. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंदर्भात कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.राज्यात कोरोना विषाणूचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्था शासनाच्या निर्देशानुसार बंद आहेत. मात्र शासन निर्देशानुसार शैक्षणिक प्रथम वर्ष सोडून उर्वरित अभ्यासक्रम १ ऑगस्ट पासून प्रथम वर्ष १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. राज्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या लक्षात घेता यात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव १०० टक्के नष्ट होईल, हे सांगणे कठिण आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे नवीन शैक्षणिक सत्र १५ जूनपासून सुरू होत आहे. या सत्रामध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होणे आवश्यक आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन अध्ययन व अध्यापन प्रक्रियेसंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यपालांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत आदेश निर्गमित केले आहेत. कोरोना विषाणूच्या संकटात महाविद्यालये सुरू करणे धोक्याचे आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन निकालानंतर वरिष्ठ महाविद्यालयीन पातळीवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी योग्य तयारी करणे आवश्यक आहे. नवीन प्रवेश प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी उसळू शकते. याद्वारे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्रात प्रथम वर्षातील महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन घ्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठातर्फे संलग्नित महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.१२ ला प्राचार्यांची सभा२०२०-२१ या नवीन शैक्षणिक सत्रातील शैक्षणिक योजना आखण्यासाठी शुक्रवार १२ जून रोजी सकाळी ११ वाजता गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित प्राचार्य तसेच विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या प्रमुखांची सभा ऑनलाईन प्लॅटफार्मवर आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये तंत्रज्ञान प्लॅटफार्मची निर्मिती, अध्यापनशास्त्र मार्गदर्शक तत्त्वे, आकर्षक व रंजक शैक्षणिक व्हिडिओ, स्वतंत्र व तत्सम प्लॅटफार्मवरील शैक्षणिक साहित्य तसेच सद्य:स्थितीतील अभ्यासक्रमाशी मॅपिंग करणे, विद्यार्थ्यांना क्रेडिटसाठी लॅब तयार करून देणे, चर्चा करून आराखडा तयार करणे, आॅनलाईन प्रवेश प्रक्रीया आचार्य पदवीकरिता ऑनलाईन मौखिक परीक्षा आदी विषयांवर सभेत चर्चा होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षण