दोन वर्षात वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 05:00 AM2021-10-03T05:00:00+5:302021-10-03T05:00:37+5:30

गाेंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विद्यापीठाचा दहावा वर्धापन दिन ‘दशमानाेत्स’ म्हणून साजरा केला जात आहे. त्याचे उद्घाटन धानाेरा मार्गावरील सभागृहात २ ऑक्टाेबर राेजी शनिवारला पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बाेलत हाेते. याप्रसंगी मंचावर विशेष अतिथी म्हणून आ.डाॅ.देवराव हाेळी, आ.कृष्णा गजबे उपस्थित हाेते.

There will be a medical and engineering college in two years | दोन वर्षात वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय हाेणार

दोन वर्षात वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय हाेणार

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : विद्यापीठाच्या डाटा सेंटरची चार काेटी रुपयांची फाइल आपण निकाली काढली. केंद्र शासनाकडून विद्यापीठाला १२ बीचा दर्जा मिळवून दिला. माॅडेल काॅलेजही आणले. गाेंडवाना विद्यापीठ हे नामांकित व विकासाचे केंद्र ठरणारे विद्यापीठ व्हावे, हे आपले स्वप्न आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच येत्या दाेन वर्षांत गडचिराेली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करून आणणार, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
गाेंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विद्यापीठाचा दहावा वर्धापन दिन ‘दशमानाेत्स’ म्हणून साजरा केला जात आहे. त्याचे उद्घाटन धानाेरा मार्गावरील सभागृहात २ ऑक्टाेबर राेजी शनिवारला पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बाेलत हाेते. याप्रसंगी मंचावर विशेष अतिथी म्हणून आ.डाॅ.देवराव हाेळी, आ.कृष्णा गजबे उपस्थित हाेते. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डाॅ.श्रीनिवास वरखडे, प्र-कुलगुरू डाॅ.श्रीराम कावळे, कुलसचिव डाॅ.अनिल चिताडे, सिनेट सदस्य प्राचार्य डाॅ.राजाभाऊ मुनघाटे, अजय लाेंढे, माजी कुलगुरू डाॅ.नामदेव कल्याणकर, विजय आईंचवार, डाॅ.कीर्तिवर्धन दीक्षित, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डाॅ. सुरेश रेवतकर आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते.
पुढे बाेलताना ना.उदय सामंत म्हणाले, विद्यापीठाच्या माध्यमातून गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात शैक्षणिक चळवळ उभी राहिली पाहिजे. विकास हा राजकारणविरहित असावा. विद्यापीठाचा विकास व्हावा, अशी आपली भूमिका असल्याने, आपण विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गडचिराेली येथील विद्यापीठात हजेरी लावत असताे, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या विकासामधून ‘रूसा’मधून विद्यापीठाला २० काेटी रुपये व महाविद्यालयांनाही निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. 
कार्यक्रमाचे संचालन प्रा.डाॅ.नरेंद्र आरेकर, प्रास्ताविक कुलगुरू डाॅ.श्रीनिवास वरखेडी यांनी केले, तर आभार कुलसचिव डाॅ.अनिल चिताडे यांनी मानले. कार्यक्रमाला चंद्रपूर, गडचिराेली जिल्ह्यातील संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी हजर हाेते. 
वार्षिकांकाचा द्वितीय पुरस्कार राष्ट्रसंत तुकडाेजी महाविद्यालय चिमूर, तृतीय पुरस्कार महात्मा गांधी महाविद्यालय आरमाेरी तर नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरी व डाॅ. आंबेडकर काॅलेज चंद्रपूर यांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला.

विविध पुरस्कार प्रदान
गाेंडवाना विद्यापीठाच्या वतीने उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, तसेच बेस्ट काेविड वीर, तसेच  विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रह्मपुरी, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार शरदराव पवार काॅलेज गडचांदूरचे प्राचार्य डाॅ.संजयकुमार सिंग यांना देण्यात आला. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांमध्ये डाॅ.प्रवीण तेलखडे, डाॅ.विजू गेडाम, डाॅ.शैलेंद्र दामाेदर देव, उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी पुरस्कार अधीक्षक संदेश देविदास साेनुले, उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार लिपिक सुचिता भय्याजी माेरे, देविदास नागपुरे, महाविद्यालय कर्मचारी अतुल अल्याडवार, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार सूरज चाैधरी, उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार नेहा समनपल्लीवार, प्रा.प्रदीप चापले यांना ‘बेस्ट काेविड वीर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

माजी कुलगुरूंचा झाला सत्कार
- गाेंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू विजय आईंचवार, माजी कुलगुरू डाॅ.कीर्तिवर्धन दीक्षित व डाॅ.नामदेव कल्याणकर यांचा विद्यापीठाच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
- चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील तळाेधी (बाळापूर) येथील समाजसेवक शिक्षण महर्षी डाॅ.तुलसीदास विठूजी गेडाम यांना ‘जीवन साधना गाैरव’ पुरस्कार देऊन विद्यापीठाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. 

वार्षिकांक स्पर्धेत मुनघाटे काॅलेजचा डंका कायम
स्थानिक गाेंडवाना विद्यापीठाच्या वतीने लेखन व साहित्य कलेला वाव देण्यासाठी महाविद्यालयांना वार्षिकांक स्पर्धेत सहभागी करून, त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येताे. सदर कार्यक्रमात कुरखेडा येथील गाेविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिकांकाला प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थापक तथा प्राचार्य डाॅ.राजाभाऊ मुनघाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विशेष म्हणजे, मुनघाटे महाविद्यालयाला सलग चाैथ्यांदा प्रथम पुरस्कार मिळाला.

यांना मिळाला रासेयाे पुरस्कार

गाेंडवाना विद्यापीठाच्या वतीने शिवाजी महाविद्यालय राजुरा, डाॅ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर व शंकरराव बेझलवार महाविद्यालय, अहेरी यांना उत्कृष्ट रासेयाे महाविद्यालय एकक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयाचे रासेयाे कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की, आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूरचे डाॅ. मिलिंद भगत व बेझलवार महाविद्यालयाचे प्रा. मंगला बन्साेड यांना उत्कृष्ट रासेयाे कार्यक्रम अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
महात्मा गांधी काॅलेज आरमाेरीची विद्यार्थिनी प्रियंका ठाकरे, भिसी येथील महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम नारनवरे व चामाेर्शीच्या हरडे महाविद्यालयाचा विद्यार्थी मनीष कुनघाडकर आदींना उत्कृष्ट रासेयाे स्वयंसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
रासेयाेचा सर्वाेत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक पुरस्कार विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक डाॅ. नरेेश मडावी यांना मिळाला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

Web Title: There will be a medical and engineering college in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.