शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

मामाच्या घरी शंभर गायी; पण सकाळी चहासाठीही दूध मिळत नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 16:46 IST

आरमोरी तालुक्यात ठाणेगावात एकमेव डेअरी: सहकारी संस्था निघाल्या अवसायनात

लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : ऐतिहासिक स्थळे व १०३ लहान-मोठ्या गावांचा समावेश असलेल्या आरमोरी तालुक्यात पशुपालक व जनावरांची संख्या लक्षणीय आहे; पण दुधाळ जनावरांची संख्या फार कमी असल्याने बाहेरच्याच दुधावर नागरिकांना अवलंबून राहावे लागते. याशिवाय ज्या शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे आहेत. त्यांना दूध विक्रीसाठी डेअरी किंवा ग्राहक मिळत नाही. पर्यायाने भाव कमी मिळतो. आरमोरी तालुक्यातील ठाणेगावात एकमेव दूध डेअरी असल्याने दूध उत्पादन व विक्रीला वाव नाही. 'मामाच्या घरी शंभर गायी; पण सकाळी चहासाठी दूध नाही!' अशी स्थिती सध्या वैरागड, ठाणेगाव परिसरात दिसून येत आहे.

आरमोरी तालुक्यात वैरागड, ठाणेगाव या दोन गावांत सहकारी दुग्ध संकलन केंद्र होते. वैरागड येथे जय किसान दुग्ध सहकारी संस्था या नावाने नोंदणीकृत दूध डेअरी होती. ही संस्था चांगली आर्थिक भरभराटीला आली होती. संस्थेला स्वमालकीची जागादेखील आहे. वैरागड येथील दूध संकलन केंद्रावर परिसरातील सुकाळा, मोहारी, वडेगाव, डोंगरतमाशी, मेंढेबोडी, नागरवाही, देलनवाडी येथील पशुपालक दूध विक्रीसाठी आणत असत; पण कालांतराने वैरागड येथील सहकारी दुग्ध संस्था अवसायनात निघाली तेव्हापासून वैरागड येथे नवीन दुसरे दूध संकलन केंद्र सुरू झाले नाही. आता अपेक्षित भाव मिळत नाही. पर्यायाने दूध उत्पादन घटले आहे. ठाणेगाव येथील दूध संकलन केंद्रावर डोंगरगाव, वासाळा, चुरमुरा, चामोर्शी, वनखी, चामोर्शी माल, कनेरी रामाळा आदी गावातील दूध उत्पादक शेतकरी दूध विक्रीसाठी आणतात. संस्थेची सभासद संख्या ५८१ आहे.

दुधाळ जनावरे वाटपाचा आकडा बनावट?• शासनाच्या विविध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे सवलतीत वाटप केले जाते. तशी आकडेमोड संबंधित अधिकाऱ्यांकडून दाखवली जाते; पण हा आकडा बनावट असतो.• नव्यांच्या जागी जुनी जनावरे दाखवून अनुदान लाटले जाते. यामुळे दुधाळ जनावराची संख्या जिल्ह्यात वाढलेली नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करणे गरजेचे आहे. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

दुधाळ जनावरांना जी खुराक द्यावी लागते तेवढा पैसा दुग्ध उत्पादकांना मिळत नाही. घरोघरी जाऊन कमी दरात दूध विक्री करावी लागते. त्यामुळे वैरागड येथे दूध संकलन केंद्र सुरू करावे.- राजेश बावनकर, शेतकरी, वैरागड

आरमोरी तालुक्यात ठाणेगाव येथे १९८३ मध्ये जय लक्ष्मी दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन झाली. आर्थिक लाभामुळे ही संस्था आर्थिक भरभराटीस आली. ही संस्था आजही चांगल्या प्रकारे सुरू आहे.- गजानन नंदरधने, सचिव, जयलक्ष्मी दूध उत्पादक सहकारी संस्था 

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाGadchiroliगडचिरोली