लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील आदिवासी नागरिकांची उपजीविका वनोपजावर अवलंबून आहे. जिल्ह्यातील आदिवासी मोहफुलांच्या मदतीने मद्य तयार करतात. परंतु जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी असल्याने येथील आदिवासी व बिगर आदिवासी नागरिकांना चोरून लपून मोहफुले खासगी व्यापाऱ्यांना विकावे लागते. परिणामी येथे फारशी स्पर्धा नसल्याने मजुरांकडील मोहफुलाला चांगला भाव मिळत नाही.
पहाटेच्या सुमारास जंगलात तसेच शेतशिवारात जाऊन मोहफुल संकलित करावे लागते. मोहफुल वाहतूक, साठवणूक करावी लागते. संकलित होणारे मोहफुल नेमके विकायचे कुठे, असा प्रश्न आदिवासी नागरिकांसमोर आहे. तालुक्यासह जिल्ह्यात मोहफुल खरेदीसाठी शासकीय केंद्रच नसल्याने खासगी व्यापाऱ्यांनाच मोह फुलाची विक्री करावी लागत आहे. यात संकलन करणाऱ्या गरजूंपेक्षा व्यापाऱ्यांचाच अधिक फायदा होत असल्याचे दिसून येते. शासनाने आधारभूत केंद्र व प्रक्रिया उद्योग सुरू करावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासूनची कायम आहे.
मजुरांची होत आहे लुटग्रामीण भागातील जंगलातून मोठ्या मेहनतीने मोहफुले संकलीत जात आहेत. परंतु ही फुले कुठे विकायची हे माहीत नसल्याने काही व्यापारी मोहफुले घेऊन त्या बदल्यात अत्यल्प मोबदला देत आहेत. त्यामुळे मोहफुलांपासून होणारा फायदा व्यावसायिक घेत आहेत.
नवीन मोहफुलापेक्षा जुन्या मोहफुलांना अधिक दरवाळलेले नवीन मोहफुल सध्या ४० रुपये किलो दराने ग्रामीण भागात विकले जात आहे. तर जुन्या मोहफुलाला किलोमागे ८० रुपये मिळत आहे. काही व्यापारी खेडेगावात वाहनाने जाऊन मोहफुल खरेदी करून नेत असल्याची माहिती आहे.
परिसरानुसार मिळतो भावमोह फुलाची वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या किमतीत विक्री केली जाते. सध्या ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो वाळलेले मोह फुल खासगी दुकानदार तसेच काही किरकोळ व्यापारी खरेदी करत आहेत. परंतु वेगवेगळ्या भागात वेगवेगळा भाव मिळतो.
मोह फुलांचा सर्वाधिक वापर दारू गाळण्यासाठीजंगलासह गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर मोहाची झाडे दिसून येतात. शेतकऱ्यांसह अन्य नागरिकही मोह फुलाचे संकलन मार्च व एप्रिल महिन्यात करतात. जवळपास एक महिना मोह फुल संकलन हंगाम चालतो. बरेच जण मोह फुलाचा वापर जनावरांच्या खाद्यासाठी करतात. तर बहुतांश जण मोह फुलाची विक्री दारू गाळणाऱ्या अवैध विक्रेत्यांकडे करतात. त्यामुळे जिल्ह्यात मोह फुलाचा सर्वाधिक वापर दारू गाळण्यासाठी केला जातो.
७० किलो जुन्या मोहफुलांना व्यापाऱ्यांची अधिक पसंतीमोहफुल एका हंगामात एका कुटुंबातील दोघे जण संकलीत करतात. ओले मोहफुल जास्त दिसतात. मात्र वाळल्यावर निम्मे होतात.
"मोहफुलांच्या हंगामात अनेकांना रोजगार मिळतो. मोहफुलांना योग्य बाजारभाव मिळावा यासाठी हमी केंद्र सुरु होणे आवश्यकच आहे. मोहफुलांवर आधारित प्रक्रिया उद्योग देखील उभारण्यात यावेत यासाठी वनमंत्र्यांना भेटणार आहे."- डॉ. मिलिंद नरोटे, आमदार