शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

...तर रब्बीची पेरणी होणार अशक्यप्राय; हंगाम यावर्षी वाया जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:41 IST

सौर कृषिपंप लावण्याकरता विलंब : मागणीमध्ये अचानक वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : धानाचे पीक निघाले असून, रब्बी पिकांच्या पेरणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून घेण्यासाठी महावितरण व मेडाकडे तगादा लावला आहे. मात्र विविध कारणे सांगून कंपन्या सौर कृषिपंप लावून देण्यास विलंब करीत आहेत. त्यामुळे रब्बी पिकांचा हंगाम यावर्षी वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासनाने मागेल त्याला सौर कृषिपंप देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सौर कृषिपंप मंजूर केले आहेत. अर्ज स्वीकारणे व मंजूर करण्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण पार पाडत आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्याने पैसे भरून एजन्सी निवडायची असते. जी एजन्सी निवडली त्याच एजन्सीने सौर कृषिपंप लावून देणे गरजेचे आहे.

पावसाळ्याच्या कालावधीत सौर कृषिपंप लावून देण्यास एजन्सी तयार होत्या. मात्र अनेकांच्या विहिरीजवळ जाणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात पंप लावण्यास सांगितले. पंप लावून देण्यासाठी आता अचानक मागणी वाढली आहे. त्यामुळे पंप लावून देताना कंपनीच्या एजंटची तारंबळ उडत आहे. आता रब्बीच्या पिकांची पेरणी सुरू झाली आहे. पुन्हा जास्तीत जास्त १५ दिवस पेरणी करता येणार आहे. त्यानंतर मात्र रब्बी पिकांच्या पेरणीचा कालावधी निघून जाणार आहे. सौर कृषिपंप न बसल्याने रब्बीची पेरणी शक्य होणार नाही. अचानक मागणी वाढली हे जरी खरे असले तरी कंपन्यांनी पंप लावणाऱ्या मजुरांची संख्या वाढविण्याची गरज आहे. 

निवडणुकीचे कारण विधानसभेची निवडणूक असल्याने सौर कृषीपंपाबाबतच्या काही प्रशासकीय बाबी पूर्ण होण्यास उशीर लागत असल्याचे कारण सांगीतले जात होते. आता मात्र निवडणूक संपली आहे. उर्वरीत अर्ज मार्गी लागतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :CropपीकGadchiroliगडचिरोली