शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेली शहरातील युवक गांजाच्या आहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 05:00 IST

अनेक युवक चाेरून-लपून सिगारेट ओढतात, मात्र ही बाब अनेक पालकांना माहीत नाही. सायंकाळच्या सुमारास इंदिरा गांधी चाैकातील पानठेल्यांच्या मागे युवक सिगारेटचे धूर साेडत असल्याचे दिसून येतात. काही जणांना तर  चहासाेबत सिगारेट ओढण्याची सवय झाली आहे. एका हातात चहाचा कप तर दुसऱ्या हातात सिगारेट दिसून येते.

दिगांबर जवादे लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शहरातील अनेक ठिकाणी गांजाची विक्री केली जात असून, शहरातील शेकडाे तरुण गांजाच्या आहारी गेले आहेत. गांजा ओढण्याचे काही प्रमुख ठिकाणेसुध्दा बनली आहेत. गडचिराेली शहरातील काही युवकांना गांजा ओढण्याची सवय जडली आहे. वर्दळीच्या ठिकाणी गांजा ओढणे शक्य नसल्याने काही युवक पाेटेगाव मार्ग, सेमाना देवस्थान परिसर व इतर माेकळ्या जागी  रात्रीच्या सुमारास जाऊन गांजा घेत असल्याचे दिसून येते. गांजा ओढणाऱ्या युवकांच्या टाेळ्या तयार झाल्या आहेत. रात्रीच्या सुमारास या टाेळ्यांची मैफल रंगत असल्याचे दिसून येते. 

१०० रुपयाला दाेन ग्रॅमगांजाची खरेदी-विक्री व वाहतूक तसेच सेवनावर शासनाने प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे गांजाची विक्री करणे गुन्हा आहे. तरीही शहरातील जवळपास १० विक्रेते गांजाची चाेरून-लपून विक्री करतात. १०० रुपयाला केवळ दाेन ग्रॅम गांजा मिळतो.

पाेलिसांनी लक्ष द्यावेदिवसेंदिवस युवा वर्ग गांजाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. गांजा ओढण्याची काही ठिकाणे निश्चित झाली आहेत. या ठिकाणांवर पाेलिसांनी पाळत ठेवण्याची गरज आहे. पाेलीस कारवाई झाल्यास गांजा ओढणाऱ्यांना आळा बसण्यास मदत हाेईल.

चाेरून-लपून ओढतात सिगारेटअनेक युवक चाेरून-लपून सिगारेट ओढतात, मात्र ही बाब अनेक पालकांना माहीत नाही. सायंकाळच्या सुमारास इंदिरा गांधी चाैकातील पानठेल्यांच्या मागे युवक सिगारेटचे धूर साेडत असल्याचे दिसून येतात. काही जणांना तर  चहासाेबत सिगारेट ओढण्याची सवय झाली आहे. एका हातात चहाचा कप तर दुसऱ्या हातात सिगारेट दिसून येते.

काही दिवसांपूर्वी गडचिराेली शहरातील पाेटेगाव मार्गावरील एक युवक तसेच काेटगल येथील एका इसमावर कारवाई करून त्यांच्याकडून गांजा जप्त केला आहे. दरदिवशी सायंकाळी एमआयडीसी परिसर, स्टेडीयमवर पाेलिसांमार्फत पेट्राेलिंग केली जाते. शहरातील इतरही गांजा विक्रेत्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. गांजा विक्रेत्यांवर लवकरच कारवाई केली जाईल. तसेच गांजा पिण्याच्या अड्ड्यांवरही धाड घातली जाईल.- अरविंदकुमार कतलाम, ठाणेदार, पाेलीस स्टेशन गडचिराेली

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस