शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गिधाड उपहारगृह योजनेला घरघर, गिधाडे होताहेत नामशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:57 IST

आकाशातील घिरट्याही बंद : जिल्ह्यात २०० गिधाडांची होती नोंद, वनविभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गिधाड पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी गडचिरोली वनवृत्तातर्फे नऊ वर्षांपूर्वी गिधाड उपाहारगृह उभारले होते. तेव्हा जिल्ह्यात गिधाडांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. दोन ते तीन वर्षे गिधाडांचे संवर्धन झाले; त्यानंतर वन विभागाने दुर्लक्ष केल्याने गिधाडांची संख्या झपाट्याने घटली.

गिधाडांसाठी उपहारगृहांची सोय असताना वेगवेगळ्या भागात गिधाडांचा वावर असायचा. ही संख्या २०० च्या आसपास पोहोचली होती. गडचिरोली वन विभागात १०० हून अधिक गिधाडे होती. एकट्या गडचिरोली विभागात गिधाडांसाठी पाच उपाहारगृहे निर्माण केली होती. ही सर्वच उपाहारगृहे आता बंद आहेत. गडचिरोली- धानोरा मार्गावर चार किमी अंतरापर्यंत गिधाड संवर्धनाचे फलक गडचिरोली वन विभागाने लावले होते. आता गिधाडांचे संवर्धनच होत नसल्याने हे फलक देखावा ठरत आहेत. 

मृत जनावरेही मिळेनात जनावरे म्हातारी झाली की त्यांची कसायाला विक्री केली जातात. आता पशुपालकही पशुधन घरी मरू देत नाहीत. गिधाडांना मृत जनावरे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे गिधाड काय खाणार, असा प्रश्न आहे. त्यातच वन विभागाने तर गिधाडांचे उपाहारगृहसुद्धा बंद केले.

पक्षीमित्रांमध्ये नाराजीगडचिरोली वन विभागात २१ गिधाड मित्र नेमून त्यांच्यावर उपाहारगृह चालविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मृत जनावरे येथे आणून टाकण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ही उपाहारगृह बंद केल्याने गिधाडांना अन्न मिळणे बंद झाले. गिधाड मित्रांचाही रोजगार गेला.

जिल्ह्यात पाच ठिकाणी होते उपहारगृहजिल्ह्यात पांढऱ्या पाठीचे, लांब चोचीचे, हिमालयीन, काळे गिधाड आदींचा समावेश होता. यापैकी काळे गिधाड आकाराने सर्वात मोठे असून पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातच आढळले होते. गडचिरोली तालुक्यातील माडेतुकूम- बोदली, मुडझा, मारकबोडी, चामोर्शी तालुक्यातील मालेरमाल व कुनघाडा रै.. सिरोंचा तालुक्यात एक उपाहारगृह निर्माण केले होते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली