शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

नदीतून जीवघेणा प्रवास करत गाठावे लागत आहे गाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 14:49 IST

Gadchiroli : चारही बाजूने वेढलेल्या कर्जेलीवासीयांचे दुःख कधी संपणार?

कौसर खानलोकमत न्यूज नेटवर्कसिरोचा : तालुका स्थळापासून ६४ कि.मी. अंतरावर असलेल्या रमेशगुडम ग्रामपंचायत अंतर्गत अतिदुर्गम गाव म्हणून कर्जेली या गावाची ओळख आहे. सिरोंचा तालुक्यातील हे शेवटचेच गाव. विपरीत भौगोलिक परिस्थिती आणि मोजक्याच लोकांची वस्ती, त्यामुळे आतापर्यंत या गावाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे, मात्र येथील नागरिकांना बाराही महिने नावेनेच गाव गाठावे लागत आहे.

अतिदुर्गम कर्जली या गावाला जाण्यासाठी बारमाही पक्का रस्ताही झालेला नाही. पावसाळ्यात एका बाजूला रमेशगुडम नाला, दुसऱ्या बाजूला विडरघाट नाला, तिसऱ्या बाजूला इंद्रावती नदी अशा पद्धतीने हे गाव पाण्याने वेढलेले असते. गावातून बाहेर जाण्यासाठी नावेने जावे लागते. आजारी लोकांना, गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगानूरला नेण्यासाठी नावेने गावातून बाहेर निघून बैलबंडीने मोठी कसरत करून जावे लागते. दरदिवशी या गावातील नागरिक, महिला, मुलांना नावेने प्रवास करावा लागत आहे.

तिन्ही बाजुने कर्जेली हे गाव पाण्याने वेढले आहे. उन्हाळ्यात दोन नाल्यांना पाणी कमी राहते. मात्र पावसाळ्यात या दोन्ही नाल्यांना पूर येते. या पुरातून मार्ग काढणे गावकऱ्यांसाठी कठीण होते. दुसरीकडे इंद्रावती नदी आहे, ती तर ओलांढणे अतिशय कठीण आहे.

आठ दिवसांनीच सुरळीत होते वीजपुरवठाबऱ्याचदा अत्यावश्यक काम असल्यास तालुकास्तरावर पोहोचण्यासाठी विलंब होतो. प्रसंगी कुठेही मुक्काम करावा लागतो. दूरसंचार सेवा तर सोडा, वीजपुरवठा एकदा खंडित झाला की पूर्ववत सुरू होण्यासाठी आठवडा लागतो. त्यामुळे या गावाचा तालुक्याशी नेहमीच संपर्क तुटलेला असतो. गावाची लोकसंख्या ५०० च्या जवळपास आहे. रेशनचे धान्य आणण्यासाठी रमेशगुडम येथे नावेनेच जावे लागते. शासनाने या ठिकाणी पुलाची निर्मिती करणे आवश्यक आहे. पूल झाल्यास या नागरिकांचा जीवघेणा प्रवास थांबण्यास मदत होईल.

एकमेव टॅक्सीचा नागरिकांना आधारया भागात चालणारी एकमेव खासगी टॅक्सी रमेशगुडमवरून चालते. या टॅक्सीने कर्जेलीवासीय तालुक्याला येतात. या गावाला बारमाही रस्ता झाल्यास गावकरी मुख्य प्रवाहात येऊ शकतात. शासनाच्या योजना या गावात कशा पोहोचतात माहीत नाही. अविकसित आणि प्रगत्तीपासून कोसो दूर असलेल्या या गावात विकासाचा चिखलातून मार्ग काढत पावसाच्या दिवसामध्ये नावेतून गावाबाहेर पडावे लागते. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीMaharashtraमहाराष्ट्र