शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

रानटी हत्तीचा थरार; पंचनाम्यासाठी गेलेल्या चालकाला सोंडेत उचलून आपटले, पळसगाव उपक्षेत्रातील घटना

By गेापाल लाजुरकर | Updated: September 16, 2023 21:00 IST

पळसगाव उपवनक्षेत्रातील या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

गडचिराेली : आरमोरी वनपरिक्षेत्रात वाघांच्या हल्ल्यात महिलेचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच १६ सप्टेंबरला नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सहायक वनसरंक्षकांसमवेत गेलेला वनविभागाचा चालक रानटी हत्तीणीच्या तावडीत सापडला. यावेळी हत्तीने त्यास सोंडेत पकडून आदळले, त्यानंतर उचलून दूर फेकले. यात चालक जागीच ठार झाला. पळसगाव उपवनक्षेत्रातील या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

सुधाकर आत्राम (५०) असे शहीद वाहनचालकाचे नाव आहे. गेल्या आठ दिवसांपासून पळसगाव उपक्षेत्रात १९ रानटी हत्तींच्या कळपाचा वावर आहे. महादेव गड पहाडीच्या कक्ष क्रमांक ८५ मध्ये आगमन होताच सुरक्षा आणि सतर्कता बाळगण्यासाठी वन विभागाची चमू हत्तीचा वावर असलेल्या परिसरात दाखल झाली हाेती. सहायक वनसंरक्षक संदीप भारती हे आपल्या वाहनाने याच भागात दाखल झाले हाेते. तेव्हा वाहन बाजूला ठेवून वन कर्मचाऱ्यांसोबत कर्तव्य बजावत असताना अचानक आलेल्या रानटी हत्तिणीने सुधाकर आत्राम यांना उचलून आपटले व पुन्हा रस्त्यावरून जंगलात नेऊन फेकले. त्यामुळे आत्राम यांचे शरीर छिन्नविछिन्न होऊन जागीच गतप्राण झाले. घटनेनंतर वन कर्मचारी हत्तिणीला पिटाळून लावले. त्यानंतर आत्राम यांचा मृतदेह देसाईगंज येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. यावेळी सहायक वन संरक्षक संदीप भारती, आरमाेरीचे वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्र सहायक मुखरु किनेकर, वनरक्षक शिऊरकर, बाळू अतकरे, रुपा सहारे तसेच वनमजूर व नागरिक उपस्थित होते.

रानटी हत्तींच्या कळपावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच त्यांना मानवी वस्तीपासून दूर पळवण्यासाठी पश्चिम बंगाल राज्यातील एनजीओ हुल्ला टीमचे सेन गुप्ता यांच्याशी संपर्क झाला असून ते १७ सप्टेंबर रोजी सकाळी वडसा वन विभागातील रानटी हत्तींच्या कळपाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या टीमसह येत आहेत.- अविनाश मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी 

टॅग्स :forest departmentवनविभागDeathमृत्यू