शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

याेजनेचे 6 हजार मिळण्यासाठी आता 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 05:00 IST

शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत चार महिन्याला दाेन हजार रूपये असे वर्षातून तीन वेळा सहा हजार रूपये संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. संबंधित व्यक्तीची ओळख पटावी, यासाठी शासनाने ई-केवायसी करणे आवश्यक केले आहे.  आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी साेयीचे झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : पीएम किसान सन्मान याेजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आवश्यक करण्यात आली आहे. ई-केवायसी करण्याची मुदत ३१ मेपर्यंत हाेती. मात्र आता शासनाने तब्बल दाेन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत ई-केवायसी करता येणार आहे. शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत चार महिन्याला दाेन हजार रूपये असे वर्षातून तीन वेळा सहा हजार रूपये संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. संबंधित व्यक्तीची ओळख पटावी, यासाठी शासनाने ई-केवायसी करणे आवश्यक केले आहे.  सुरुवातीच्या कालावधीत पीएम किसान याेजनेची साईट व्यवस्थित काम करीत नसल्याने केवायसी करण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू हाेते. मे महिन्यात मात्र अनेकांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. मात्र काही शेतकरी अजूनही शिल्लक आहेत. देशभराचा विचार करत शासनाने मुदतवाढ दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी साेयीचेसुरूवातीला ३१ मार्चपर्यंत केवायसीची मुदत हाेती. त्यानंतर ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली. पुन्हा आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी साेयीचे झाले आहे.

१ लाख ५२ हजार ६०९ शेतकऱ्यांना लाभजिल्ह्यात १ लाख ५५ हजार ४५५ शेतकऱ्यांनी नाेंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ५२ हजार ६०९ शेतकऱ्यांना या याेजनेचा लाभ दिला जात आहे. नाेंदणीचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे, पाेलीस विभागाच्या वतीने शिबिर घेऊन नाेंदणी केली जात आहे. त्यामुळे दुर्गम भागातील शेतकरी या याेजनेचे लाभार्थी हाेत आहेत.

केवायसीसाठी शेतकऱ्यांची कसरत

अनेक शेतकऱ्यांच्या आधारकार्डासाेबत माेबाईल क्रमांक लिंक नाही. त्यामुळे त्यांना सीएससी सेंटरमध्ये जाऊन बायाेमेट्रिक केवायसी करावी लागत आहे. त्यासाठी शहरात जावे लागत आहे. काहीजणांचे अंगठे जुळत नसल्याने ई-केवायसी करण्यात फार माेठी अडचणी येत आहे.  - रघुनाथ बारापात्रे, शेतकरी

केवायसी करूनही काही शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने या याेजनेबाबत तक्रार कुठे करायची, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडते. त्यामुळे काही शेतकरी अजुनही या याेजनेच्या लाभापासून वंचित आहेत. तालुकास्तरावर कर्मचारी नियुक्त करावे.    - वासुदेव शेंडे, शेतकरी

४० टक्के शेतकऱ्यांची केवायसी नाहीदुर्गम भागातील शेतकऱ्यांना अजूनही ई-केवायसीबाबत माहिती नाही. तसेच मध्यंतरी साईट बंद असल्याने ई-केवायसी करणे शक्य नव्हते. जिल्ह्यात एकूण १ लाख ५५ हजार ४५५ शेतकऱ्यांची नाेंदणी झाली आहे. त्यापैकी ३१ मेपर्यंत जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना