शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रात महाविद्यालयातील पटसंख्या वर्षभरात २० हजारांनी घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:46 IST

Gadchiroli : विद्यापीठ कॅम्पसमध्ये विविध कोर्सेसला प्रवेशासाठी विद्यार्थी मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रात मुक्त विद्यापीठ आणि दूरस्थ शिक्षण अभ्यास केंद्रांमुळे विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील पटसंख्या गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० हजारांनी घटली आहे. 

विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, इंदिरा गांधी हिंदी विश्वविद्यालय, वर्धा, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठाचे अभ्यास केंद्रे सुरू आहेत. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्येवर फार गंभीर परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. या विद्यापीठाची एकूण विद्यार्थी संख्या मागील वर्षाच्या तुलनेत २० हजारांनी कमी झालेली आहे. त्यामुळे महाविद्यालयातील अनेक शैक्षणिक तुकड्या बंद होऊन शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत, असे प्राध्यापकांच्या संघटनेने म्हटले आहे. कुलगुरू व इतर अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन दुरुस्त शिक्षण केंद्राला मंजुरी देऊ नये, यासाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

अभ्यासकेंद्रांना परवानगी देऊ नयेगोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये मुक्त विद्यापीठ, दूरस्थ शिक्षण तसेच इतर विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रांना परवानगी न देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे आणि सचिव डॉ. विवेक गोर्लावार यांनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

या तीन विद्यापीठाने पूर्वपरवानगीबाबत ठराव केले पारितपटसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अधिसभेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांना जिल्हाबंदी केली. तसेच विद्यापीठ परिक्षेत्रात अभ्यास केंद्रे उघडताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याबाबत ठराव अधिसभेत पास केलेला आहे.

प्राधिकरणाने काय दिला अभिप्राय?गोंडवाना विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयाअंतर्गत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून याबाबत विद्यापीठाच्या विद्या परिषद, सिनेट व व्यवस्थापन परिषदेमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याबाबत उपरोक्त प्राधिकरणाने अभिप्राय दिला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर विद्यार्थ्यांअभावी भविष्यात अनेक महाविद्यालय बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीuniversityविद्यापीठ