शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बोलण्यासाठी नेले अन् गोळ्या झाडून मारले, अडीच तासांनंतर मिळाला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 10:40 IST

नक्षल्यांनी घेतला बळी : प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न भंगले

रमेश मानगोनवार

भामरागड (गडचिरोली) : आई- वडील सधन शेतकरी. भामरागड तालुक्यातील मरदूरमधून अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन तो गडचिरोलीत आला. जोमाने तयारी सुरू केली होती. होळीसाठी गावी गेला अन् तेथेच तो नक्षल्यांची शिकार ठरला. शेतात काम करत असताना बोलण्यासाठी म्हणून त्याला गणवेशातील तीन नक्षली दूर घेऊन गेले, त्यानंतर त्याला गोळ्या झाडून संपविले व अडीच तासांनंतर त्याचा मृतदेह आढळला.

साईनाथ चैतू नरोटी (२६), असे त्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पदवीच्या अंतिम वर्षात शिकत होता. चैतू नरोटी हे मरदूर (ता. भामरागड) येथील रहिवासी. गावातील सधन शेतकऱ्यांत त्यांचा समावेश आहे. त्यांचा मुलगा साईनाथ लहानपणापासूनच हुशार होता, त्याला आई- वडिलांनी जिद्दीने शिकवले. तो होळीला गावी आला होता. त्याला परत जायचे होते; पण आई- वडिलांसह शेतात गेला. ९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता तीन नक्षली वेशभूषेत आले, बोलण्यासाठी म्हणून त्याला घेऊन गेले. त्यानंतर तो परतलाच नाही.

एका शेतकऱ्याने मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली, त्यानंतर साईनाथ नरोटीच्या कुटुंबाने तिकडे धाव घेतली. चैतू नरोटे यांना तीन मुले, त्यापैकी थोरला शेती करतो, धाकला शिक्षण घेतो, तर मधवा असलेला साईनाथ हा गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पोलिस भरतीतही त्याने नशीब अजमावले होते. दरम्यान, सायंकाळी मृतदेह नातेवाइकांकडे सोपविला. रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.

धुळवडीला गावी जाणे बेतले विद्यार्थ्याच्या जीवावर... नक्षल्यांनी गोळी झाडून केली हत्या

कुटुंबीयांना शोक अनावर

मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून आई- वडील व दोन भावंडांनी टाहो फोडला. आमच्या निष्पाप लेकराची काय चूक, त्याला का म्हणून मारले, असे म्हणत आई- वडिलांसह नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे भामरागड ग्रामीण रुग्णालय परिसरातील वातावरण सुन्न झाले होते.

भामरागड येथे त्याने शिक्षण घेतले होते, महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो चार ते पाच वर्षांपासून गडचिरोली येथे होता. काही एक चूक नसताना त्याची हत्या करण्यात आली. अधिकारी बनवून त्यास प्रशासकीय सेवेत पाठवायचे होते; पण आता सगळेच संपले.

- चैतू नरोटे, साईनाथचे वडील

मरदूर येथील घटनेतील संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. नारगुंड पोलिस घटनास्थळी गेले होते. मृत विद्यार्थी पोलिसांचा खबरी नव्हता; पण त्या संशयाने किंवा तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने त्यास संपविले असावे, अशी प्राथमिक माहिती आहे. अधिक तपास सुरू आहे.

- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली