शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

वरात नंतर काढू, आधी मतदानाचा हक्क बजावू तुळशी येथील वराने सहकुटुंब केले मतदान

By गेापाल लाजुरकर | Updated: April 19, 2024 13:42 IST

देसाईगंज तालुक्याच्या तुळशी येथील एका वराने शुक्रवारी सकाळी विवाह समारंभासाठी गावातून वरात निघण्यापूर्वी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावत ‘वरात नंतर काढू, आधी मतदानाचा हक्क बजावू’ म्हणत लोकशाहीचा मान राखला

गडचिराेली : लाेकशाहीच्या उत्सवात आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी देसाईगंज तालुक्याच्या तुळशी येथील एका वराने शुक्रवारी सकाळी विवाह समारंभासाठी गावातून वरात निघण्यापूर्वी मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. ‘वरात नंतर काढू, आधी मतदानाचा हक्क बजावू’ याचा प्रत्यय तुळशी येथे आला.देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथील रहिवासी सुरेश अवसरे यांचे चिरंजीव प्रफुल यांचा विवाह मु. सोनी (चप्राड) ता. लाखांदूर जि. भंडारा येथील रहिवासी आनंदराव भावे यांची कन्या शिल्पा हिच्या सोबत शुक्रवार १९ एप्रिल रोजी सकाळी ११: ३० वाजता नियाेजित हाेता. हा विवाह साेहळा वधुमंडपी सोनी (चप्राड) येथे पार पडणार हाेता. विवाह संमारंभाला जाण्यापूर्वी वराने आई-वडील, आजी, काका यांच्यासह तुळशी येथील बुथ क्रमांक १३३ वर सहकुटूंब मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. नागरिकांनी व्यस्त कामातूनही वेळ काढून लाेकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करावे, असे आवाहन प्रफुल अवसरे यांनी केले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४GadchiroliगडचिरोलीElectionनिवडणूक