शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तलावानेच केले शेकडाे हेक्टर शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 05:00 IST

नवेगाव माल येथील गावतलाव पुरातन आहे. तलावाच्या आतील भागात शेती आहे. त्यामुळे आतील भागात शेतजमीन असलेले शेतकरी तलावात मुबलक पाणी साचू देत नाही. तलाव पाळ ही गवती जागेत असून तलावातील आतील भागात शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. वीस वर्षांपूर्वी तलावातील आतील जमिनी लागवडीखाली पाहिजे त्या प्रमाणात नव्हत्या. आता मात्र आतील भागात असलेल्या शेतजमिनी लागवडीखाली आल्या असल्याने तलावातील पाणी जाण्यासाठी मार्ग नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नवेगाव (माल) येथील गावतलावाची पाळ फुटून तलावामागील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे आवत्या व धान प-ह्यांमध्ये गाळ साचून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  नवेगाव माल येथील गावतलाव पुरातन आहे. तलावाच्या आतील भागात शेती आहे. त्यामुळे आतील भागात शेतजमीन असलेले शेतकरी तलावात मुबलक पाणी साचू देत नाही. तलाव पाळ ही गवती जागेत असून तलावातील आतील भागात शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. वीस वर्षांपूर्वी तलावातील आतील जमिनी लागवडीखाली पाहिजे त्या प्रमाणात नव्हत्या. आता मात्र आतील भागात असलेल्या शेतजमिनी लागवडीखाली आल्या असल्याने तलावातील पाणी जाण्यासाठी मार्ग नाही. अधूनमधून दरवर्षी तलाव पाळ फुटत असते. सध्या हे तलाव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. महसूल विभाग याकडे लक्ष देत नाही. केवळ भेटी देऊन वेळ मारून निघून जाते. तलावातील ओव्हरफ्लोचे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने तलाव पाळ फुटून नुकसान सहन करण्याची दुर्दैवी पाळी शेतकऱ्यांवर येत असते. कधी रोवणी झाल्यावर तलाव फुटत असते. त्यामुळे तलावामागील शेतकऱ्यांचे नुकसान होते. तलाव पाळ फुटल्यावर शेतकरी वर्गणी गोळा करून पाळीची दुरुस्ती करीत असतात. मात्र तलाव मजबुतीकरणाकडे संबंधित विभाग लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी उपसरपंच चरणदास चौधरी, तंमुस अध्यक्ष बाबुराव चौधरी, छबिलदास चौधरी, पोचू कोहपरे, तुकड्यादास कोहपरे, बंडू चौधरी, टूमदेव डायकी, आत्माराम चौधरी, मंगलदास चौधरी, प्रवीण चौधरी, विलास कोहपरे, नकटू भिवनकर, पुरुषोत्तम डायकी, प्रेमाजी चौधरी, भैय्याजी चौधरी, मारोती दिघोरे, वासुदेव चौधरी, मारोती चौधरी यांनी केली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती