शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कोसबी ग्रामपंचायतीसमोर तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 16:52 IST

ग्रामस्थ आक्रमक : आरक्षित जागेवरील अतिक्रमण केल्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : कोजबी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तिसऱ्या दिवशीही साखळी आंदोलन सुरूच असून, आबादी जागेवरील अतिक्रमण प्रकरणाबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत

काही अनुचित प्रकार घडल्यास या सर्व प्रकरणाला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे. तिसऱ्या दिवशी उपाोषणस्थळी समितीचे अध्यक्ष सुरेश तुमरेटी, समितीच्या सदस्य दर्शना वाकडे, रामदास डोंगरवार, रसिका कुमरे, देवराव चुधरी, पुंडलिक सिडाम, रवींद्र डोंगरवार, गीता मडावी, ज्ञानेश्वर शेंडे, रामदास गावडे, विश्वनाथ तुमरेटी, गोपाल बावणे, अविनाश सिडाम, रमेश डोंगरवार, लोमेश वाकडे, श्रीरंग ठाकूर, रामदास रणदिवे, संदीप कुमरे, अशोक डोंगरवार, अरुण डोंगरवार, अरुण मडावी, दशरथ डोंगरवार आदी उपस्थित होते. २० सप्टेंबरपासून आंदोलन सुरू असून, आंदोलनाच्या आज, तिसऱ्या दिवशीही प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आरमोरी तालुक्यातील कोजबी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सोनपूर येथील आबादी जागेवर बाहेरगावातील व्यक्ती तसेच गावातील जागेची गरज नसलेल्या व्यक्ती यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने सोनपूर येथील १४ एकर आबादी जागेपैकी एकही जागा शिल्लक राहिली नाही. दरम्यान सदर अतिक्रमण हटावच्या मागणीसाठी कोजबीवासीयांनी २० सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. 

सोनपूर येथील ग्रामसभेने याबाबत वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी पत्र व्यवहार करून जागा अतिक्रमण मुक्त करण्यासाठी तसेच समितीने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायत प्रशासनाने गावाच्या विरोधात रेकॉर्ड नसलेल्या व्यक्तींना नमुना आठ देण्याचा ठराव पारित केला होता, तो रद्द करण्यात यावा. सुरू असलेले अवैध घर बांधकाम बंद पाडून जागा मोकळी करावी, सोनपूर येथे रस्त्यालगत असलेले खताचे खड्डे हटविण्यात यावे, पाणीपुरवठा सुरळीत करून पाणी टंचाईवर उपाययोजना करावी, अशी मागणी आहे. 

यापूर्वीही झाले होते आंदोलन यापुर्वी ६ जून रोजी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात सोनपूर येथील संपूर्ण गावकऱ्यांनी साखळी आंदोलन केले होते, त्या आंदोलनाची दखल घेत पंचायत समिती आरमोरीचे सहायक गट विकास अधिकारी कुर्जेकर यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली व ग्रामपंचायत प्रशासनाला तसे निर्देश दिले मात्र त्यानंतर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे अतिक्रमण मुद्दा अधिकच गाजत आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली