शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेव ६५ वर्षांचा, नवरी ५५ ची... शस्त्र चालविणाऱ्या माओवाद्यांनी बांधली रेशीमगाठ

By संजय तिपाले | Updated: June 7, 2025 12:31 IST

हळद हसली, कुंकूही चमकले : लग्नसोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह पोलिस अधिकारी वन्हाडी

संजय तिपाले लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नवरदेव ६५ वर्षांचा, तर नवरी ५५ वर्षाची चेहन्यांवरच्या सुरकुत्या अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिल्याची साक्ष देत होत्या, पण डोळ्यांत होती नवजीवनाची आस. माओवाद्यांच्या हिंसक विचारसरणीला बळी पडून वाट भटकलेली पाऊले आयुष्याच्या सायंकाळी आत्मसमर्पणाकडे वळली. ज्या हातांनी हयातभर सुरक्षा दल व निष्पाप नागरिकांवर गोळ्या इडल्या, त्याच हातांनी ६ जून रोजी रेशीमगाठ बांधली. या सोहळ्याला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलिस अधिकारी या सोहळ्यात वन्हाडी होते.

तीन-साडेतीन दशकांचा नक्षल चळवळीचा प्रवास थांबवून संसारीक जीवन जगण्यासाठी बोहल्यावर चढलेल्या बुजुर्ग जोडप्यांचे चेहरे समाधानाने फुलले होते. हळद हसली अन् कुंकवालाही चमक आलेली. जिल्हा पोलिस बलाच्या प्रोजेक्ट संजीवनी 'अंतर्गत पोलिस मुख्यालयातील शहीद पांडु आलाम सभागृहात हा अनोखा समारंभ वाजत-गाजत पार पडला. यावेळी आत्मसमर्पित १३ जोडपी विवाहबद्ध झाली. यापैकी दोन जोडपी तयाची पन्नाशी, साठी ओलांडलेली होती.

मदनी-बोटी लाजत म्हणाले, चांगलं वाटतंयमदनी गणपती तोरॅम (४५) व बोटी बैसगी उईके (६५) ही १७ ओढायांमध्ये सर्वांत ज्येष्ठ होते. मदनी अहेरी तालुक्यातील किस्तापूरची, तर बोटी भामरागड तालुक्यातील पल्ली गावचा. १९९०- १९९१ मध्ये त्यांनी नक्षल चळवळीत प्रवेश केला. मदनीवर पाच गुन्हे आहेत. तर बोटी उईकेला आपल्यावर किती गुन्हे आहेत, याचीही माहिती नाही. दोघांनी जानेवारी २०२५ मध्ये आत्मसमर्पण केले. विवाहप्रसंगी दोघेही समाधानी दिसत होते. या वयात विवाह करून आयुष्याची सुरुवात करताय, काय वाटतंय? या प्रश्नावर लाजत-लाजत दोघे एकसुरात म्हणाले, चांगलं वाटतंय.

वनिता-दालन्ना म्हणतात, आनंदात राहायचंयमदनी-बोटीनंतर वयाने खालीखाल वनिता व दालन्ना हे दूसरे ओडपे, वनिता पेक्का झुरे (५५, रा. कुरनार, ता. एटापल्ली) व दालन्ना पोचा सडमेक (६३, रा. आर्केपल्ली, ता. अहेरी) असे त्यांचे पूर्ण नाव. दोघांनीही १२२० मध्ये अहेरी दलममधून नक्षल चळचळीत पाऊल ठेवले. बनितावर ११, तर दालन्नावर ८२ गुन्हे नोंद आहेत. अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय दोघांनी जानेवारी २०२५ मध्ये शस्त्र खाली ठेवले. नक्षल चळवळीत आयुष्याची धूळधाण झाली. उर्वरित आयुष्य समाधानाने, आनंदाने जगायचंय असे ते म्हणाले.

जिल्हा पोलिस दलातर्फे वरांना नया पोशाख, वधूंना साडी, मंगळसूत्र, चप्पल-बूट जोड, संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. या सोहळ्याकरिता आत्मसमर्पित नक्षल्यांच्या नातेवाइकांनाही बोलावले होते. मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, 'लॉयड्स मेटल्स'चे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन आदी उपस्थित होते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी