शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

युवतीची प्रियकराकडून गळा दाबून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 05:00 IST

ऑगस्ट २०२१ मध्ये ऐश्वर्या हिला संदीप ऊर्फ दुर्गेश रेखलाल पटले याने हरदोली शिवारातील वैनगंगा नदीकिनारी असलेल्या पंप हाउस येथे नेले. तिथे त्याने ऐश्वर्याचे डोके दोन-तीन वेळा भिंतीवर आपटून तिला खाली पाडले. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. नंतर तुषार व संदीप यांनी मिळून तिचा मृतदेह पंप हाउसच्या विहिरीत फेकून दिला. तिची बॅग तिथेच झुडपात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तब्बल दहा महिन्यांपूर्वी गायब झालेल्या युवतीच्या हत्येला अखेर वाचा फुटली आहे. तिच्या प्रियकरानेच आपल्या मित्राच्या मदतीने तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. सदर युवती कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथील रहिवासी होती. या प्रकरणात प्रियकराला हत्येसाठी मदत करणाऱ्या मित्राला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली असून, प्रियकर मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेवाडा येथील ऐश्वर्या दिगंबर खोब्रागडे (२०) ही ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे फार्मसी कॉलेजला शिक्षण घेत होती. यादरम्यान १० ऑगस्ट २०२१ला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी ब्रह्मपुरी पोलिसांकडे केली होती. सदर मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे देसाईगंज येथील तुषार ऊर्फ तरुण राजू बुज्जेवार याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने ऐश्वर्याच्या गायब होण्यामागील रहस्य उघड केले.घटनास्थळावरून मुलीचा मृतदेह काढण्यात आला. तिची बॅगही झुडूपातून काढली. युवतीचे साहित्य, चप्पल आणि जीन्स पॅन्टवरून वडीलांनी तिची ओळख पटविली. 

प्रियकराला सोडवायचा होता तिचा ससेमिरा या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप पटले याचे देसाईगंजमध्ये वेल्डिंगचे दुकान आहे. ऐश्वर्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्यामुळे तिने त्याला लग्नाची गळ घातली. पण संदीप तिला टाळत होता. ऐश्वर्या आपला पिच्छा सोडत नाही हे पाहून त्याने तिचा ससेमिरा कायमचा सोडविण्यासाठी तिलाच संपवण्याचे ठरविले.

भिंतीवर डोके आपटले; नंतर गळा आवळलाआरोपी तुषार बुज्जेवार याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये ऐश्वर्या हिला संदीप ऊर्फ दुर्गेश रेखलाल पटले याने हरदोली शिवारातील वैनगंगा नदीकिनारी असलेल्या पंप हाउस येथे नेले. तिथे त्याने ऐश्वर्याचे डोके दोन-तीन वेळा भिंतीवर आपटून तिला खाली पाडले. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. नंतर तुषार व संदीप यांनी मिळून तिचा मृतदेह पंप हाउसच्या विहिरीत फेकून दिला. तिची बॅग तिथेच झुडपात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दाेन्ही आराेपींवर विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस