शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आता फक्त ६९.४९ टक्केच वनक्षेत्र; वनक्षेत्र झपाट्याने घटतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:47 IST

४२ वर्षांत ७ टक्क्यांनी घट : वृक्षतोडीचा परिणाम; १०,०१५.४८ वर्ग किमीवर जंगल

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यापासून विभाजनानंतर जिल्ह्यात एकूण भूभागापैकी ७६ टक्के जंगल होते. जिल्ह्यातील वनाची ही टक्केवारी आबालवृद्धांना जणूकाही तोंडपाठच होती; परंतु बेसुमार वृक्षतोड, वनावरील अतिक्रमण यासह वाढलेले शहरीकरण आदी कारणांमुळे वनक्षेत्र झपाट्याने घटले. डिसेंबर २०२४ मध्ये जाहीर झालेल्या २०२३ च्या वन सर्व्हेक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आता ६९.४९ टक्केच जंगल आहे. म्हणजेच ४२ वर्षांत तब्बल ७ टक्क्यांनी वनक्षेत्र कमी झालेले आहे.

जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौ. कि.मी. आहे. जिल्हा निर्मितीनंतर येथे एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी ७६ टक्के जंगल होते. बहुतांश गावे जंगलातच होती. अगदी गावाला लागूनच जंगल होते. या वनजमिनीवर लोकांचे अतिक्रमण वाढले. अनेकांनी उपजीविकेसाठी जमिनीचा वापर केल्याने जंगल गावापासून दूर पळू लागले. जिल्ह्यातील दरवर्षी घटणारे जंगल वाढविणे व ते कायम राखण्याचे आव्हान वन विभागासह सामान्य नागरिकांपुढेसुद्धा आहे. 

०.७८ टक्क्यांनी दोन वर्षांत वृद्धीभारतीय वन सर्व्हेक्षण विभागाने जाहीर केलेल्या २०२१ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील वनांचे प्रमाण ६८.७१ टक्के होते. त्यानंतर २०२३ चा अहवाल डिसेंबर २०२४ मध्ये जाहीर केला यात ०.७८ टक्के वाढ होत जंगलाचे प्रमाण ६९.४९ टक्क्यांपर्यंत वाढले. मात्र ही वाढलेली टक्केवारी मूळ जंगलाच्या प्रमाणात घटीत गणली जाते. १०,०१५.४८ वर्ग किमीवर जंगल शिल्लक असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. 

नैसर्गिक जंगल तोडून वृक्षारोपण काय कामाचे नैसर्गिकरित्या असलेले झुडपी, काटेरी जंगल तोडून त्या त्या ठिकाणी कृत्रिमरित्या वृक्ष लागवड केली जाते. हा प्रकार निसर्ग प्रेमींच्या पचनी पडणारा नाही. नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या झाडांना वाढवण्याची गरज भासत नाही. जिल्ह्यात वृक्षारोपणाच्या नावावर निधी मुरवण्यासाठी झाडांची लागवड केली जात आहे. मात्र, ही योजना सपशेल फसवी व डोळ्यांत धूळ झोकणारी आहे.

वृक्षतोड रोखण्यासाठी उपाययोजना तोकडी ग्रामीण भागात सरपणासाठी वृक्षांची तोड केली जाते. गावखेड्यातील नागरिक वृक्षांची तोड करणार नाहीत, यासाठी २० ते २५ वर्षांपूर्वीच गॅस सिलिंडर वाटपासारख्या योजना राबविणे गरजेचे होते. परंतु सदर योजना उशिरा अंमलात आणल्या गेल्या. वृक्षतोड बंद व्हावी यासाठी शासनाने आतापर्यंत राबविलेल्या योजना तोकड्या ठरलेल्या आहेत

"जिल्ह्यात वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून तिचा उपयोग वहिवाटीसाठी केला जात आहे. शिवाय रस्ते, तलाव, मोठमोठे प्रकल्पसुद्धा यावर उभारले जात असल्याने वनांचे प्रमाण घटत आहे. यासाठी मानवच जबाबदार आहे. घटलेले जंगल पूर्ववत करणे आव्हानात्मक आहे." - प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :forestजंगलGadchiroliगडचिरोली