शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

४० माओवाद्यांसह 'पीएलजीए'च्या जहाल कमांडरने टेकले गुडघे !

By संजय तिपाले | Updated: April 7, 2026 20:07 IST

तेलंगणा-छत्तीसगड सीमेवर चळवळीला मोठा धक्का: कर्रेगुट्टा पहाडीवर होते दहशतीचे साम्राज्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेलंगणा व छत्तीसगड  सीमावर्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून दहशतीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या नक्षलवादी चळवळीचा पाया आता पूर्णपणे हादरला आहे. नक्षल्यांच्या 'पीएलजीए' (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) चा जहाल कमांडर सोडी केशालू ऊर्फ 'मल्ला' याने आपल्या ४० सहकाऱ्यांसह पोलिसांसमोर ७ एप्रिल रोजी शरणागती पत्करली  . यामुळे माओवाद्यांचे बटालियन विखुरले असून सीमावर्ती भागात हिंसक चळवळीला  ओहोटी लागल्याचे सूत्रांनी सांगितले. ​शरण आलेल्या या नक्षल्यांनी केवळ आत्मसमर्पण केले नाही, तर त्यांच्याकडील एके-४७, इन्सास आणि एसएलआर सारख्या आधुनिक स्वयंचलित शस्त्रांचा साठाही पोलिसांकडे सुपूर्द केला.  सध्या केशालू हा संघटनेतील सर्वात प्रभावी मोहरा मानला जात होता. कर्रेगुट्टा टेकड्यांच्या दुर्गम भागात वावरणारा हा जहाल कमांडर २५ हून अधिक माओवादी तुकड्यांचे नेतृत्व करत होता. तो आता मुख्य प्रवाहात सामील झाल्याने माओवाद्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

बारसे देवा ते सोडी केशालू, आत्मसमर्पणाची मालिका सुरुच

वर्षाच्या सुरुवातीला २ जानेवारी रोजी पीएलजीए 'बटालियन-१' चा कमांडर बारसा देवा ऊर्फ देवन्ना याने शस्त्र म्यान करुन गुडघे टेकले होते. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी नक्षलवादी चळवळीत ४० वर्षे घालवलेला आणि 'पॉलिटब्युरो'चा सर्वोच्च नेता  ६२ वर्षीय थिप्पिरी तिरुपती ऊर्फ देवजी याने पोलिस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. यावेळी त्याच्यासोबत वरिष्ठ नेता मल्ला राजी रेड्डीसारखे महत्त्वाचे नेते होते. त्यानंतर ७ मार्च रोजी हैदराबादमध्ये १३० नक्षल सदस्यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत सामूहिकरीत्या शरणागती पत्करली  होती. आता या यादीत जहाल कमांडर सोडी केशालू ऊर्फ 'मल्ला' याचा समावेश झाला आहे.

माओवाद्यांची तेलंगणा राज्य समिती संपुष्टात

पोलिसांचा वाढता दबाव आणि शासनाच्या विकास योजनांमुळे नक्षलवादी आता भरकटत असल्याचे चित्र आहे. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वरिष्ठ नेत्यांनी शस्त्रे सोडल्यामुळे आता ही चळवळ पूर्णपणे खिळखिळी झाली असून, तेलंगणा राज्य समितीचे अस्तित्व आता संपुष्टात आल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Top Maoist Commander Surrenders with 40 Naxalites, a Major Blow

Web Summary : A top Maoist commander, Sodi Keshalu, surrendered with 40 members in Gadchiroli, dealing a blow to Naxalite operations. He surrendered weapons, including AK-47s. This follows other surrenders, weakening the movement. Telangana's Maoist state committee is now defunct due to police pressure and development initiatives.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडूChhattisgarhछत्तीसगड