शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

आला दिवाळीचा सण माेठा, यावर्षी आनंदाला नाही ताेटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2022 21:32 IST

यावर्षी मात्र काेराेनाचे संकट नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्त आहेत. शेतातील पिकांची स्थितीही उत्तम आहे. केंद्र शासनाने नुकतेच दाेन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले, तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यातही रक्कम जमा करण्यात आली आहे. परिणामी ‘दिवाळीचा सण माेठा, यावर्षी आनंदाला नाही ताेटा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील दाेन वर्षांतील दिवाळीवर काेराेनाचा प्रभाव हाेता. त्यामुळे हा सण साजरा करताना गर्दी झाल्यास नागरिकांच्या मनात अनामिक भीती निर्माण हाेत हाेती. यावर्षी मात्र काेराेनाचे संकट नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्त आहेत. शेतातील पिकांची स्थितीही उत्तम आहे. केंद्र शासनाने नुकतेच दाेन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले, तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यातही रक्कम जमा करण्यात आली आहे. परिणामी ‘दिवाळीचा सण माेठा, यावर्षी आनंदाला नाही ताेटा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यादिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. आश्विन शुद्ध चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी करतात. तिसऱ्या दिवशी  लक्ष्मीपूजन राहते. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा धर्मनिष्ठ व उदार बळीराजाने यज्ञ करून प्रतिकारशक्ती मिळवली होती. भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. 

दिवाळी बघून पाऊस झाला गायब  -    आठ दिवसांपूर्वी जिल्ह्याला परतीच्या पावसाने झाेडपून काढले हाेते. हा पाऊस दिवाळीपर्यंत मुक्काम ठाेकणार काय, अशी शंका उपस्थित केली जात हाेती. मात्र, पाऊस परत गेेला आहे. त्यामुळे वातावरण आल्हाददायक आहे. नागरिकांना दिवाळीचा आनंद लुटता येणार आहे. 

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा -   चाैदा वर्षांचा वनवास संपल्यानंतर प्रभू रामचंद्र हे अयाेध्येत परतले ताे दिवस दिवाळीचा. या दिवशी अयाेध्येतील नागरिकांनी घरांसमाेर दीप लावून आनंदाेत्सव साजरा केला हाेता. त्यावेळी निश्चितच फटाके नव्हते. आता मात्र दिवाळीसाठी माेठ्या प्रमाणात फटाके फाेडले जातात. यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण हाेते. फटाक्यांमुळे काही जणांचा जीव जातो. ही बाब लक्षात घेऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याकडे पुढाकार घेण्याची गरज आहे. 

बाजारपेठेत चार दिवसांपासून गर्दी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने सण अग्रिम रक्कम दिली आहे. खासगी कंपन्यांनी बाेनस दिला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसे जमा झाले आहेत. प्रत्येकाच्या खिशात पैसा आला असल्याने विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मागील चार दिवसांपासून नागरिकांची गर्दी उसळली आहे.

कापूस व साेयाबीन काढणीस सुरुवात -    दिवाळी हा सण साेबत लक्ष्मी घेऊन येते असे मानले जाते. मागील आठ दिवसांपासून कापूस काढणीला सुरुवात झाली आहे. साेयाबीन व कमी कालावधीच्या धानाची काढणी पूर्ण झाली आहे. या उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी येण्यास सुरुवात झाली आहे.  

साेयाबीन कापणीसाठी गेलेले मजूर परतले

-    दसऱ्यानंतर जिल्हाभरातील हजाराे मजूर यवतमाळ, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये साेयाबीन कापणीसाठी गेले हाेते. 

-    हे मजूर आता दिवाळीनिमित्त गावाकडे परत आले आहेत. मजुरीच्या पैशातून दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022