शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

सीमेवरच्या शहरात प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 05:00 IST

सिरोंचा तालुक्यातील आणि तेलंगणा राज्यातील प्रवाशांचे एकमेकांकडे जाणे-येणे वाढले आहे. मात्र, बसेस उभ्या करण्यासाठी किंवा बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना बसण्याची सुविधाच नसल्यामुळे चक्क झाडाखाली, उघड्यावर बसून बस स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. आंतरराज्यीय वाहतूक प्रवाशांची वाढलेली वर्दळ पाहता सिरोंचा मुख्यालयात सुसज्ज बस स्थानकाची गरज आहे.

कौसर खानलाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील आणि तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरील सिरोंचा शहरात गेल्या तीन वर्षांच्या कालावधीपासून एसटी बस स्थानकाचे काम सुरू आहे. हे काम अजूनही पूर्णत्वास गेले नसल्यामुळे एसटीच्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. भर उन्हात उघड्यावर बसणाऱ्या प्रवाशांना आता भर पावसाळ्यातही पावसात भिजत बसची प्रतीक्षा करावी लागणार का, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.सिरोंचालगत असलेल्या प्राणहिता, गोदावरी नद्यांवर आता पूल झाल्यामुळे सीमेपलीकडून होणारी एसटी बसेसची वाहतूक वाढली आहे. सिरोंचा तालुक्यातील आणि तेलंगणा राज्यातील प्रवाशांचे एकमेकांकडे जाणे-येणे वाढले आहे. मात्र, बसेस उभ्या करण्यासाठी किंवा बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना बसण्याची सुविधाच नसल्यामुळे चक्क झाडाखाली, उघड्यावर बसून बस स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. आंतरराज्यीय वाहतूक प्रवाशांची वाढलेली वर्दळ पाहता सिरोंचा मुख्यालयात सुसज्ज बस स्थानकाची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊनच येथे तीन वर्षांपूर्वी नवीन बस स्थानकाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले. तत्कालीन पालकमंत्री अंबरिशराव आत्राम यांच्या कार्यकाळात पायाभरणी झाल्यानंतर बांधकामाला सुरुवातही करण्यात आली, मात्र सत्ताबदलानंतर बस स्थानकाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून आहे.

या स्थितीसाठी जबाबदार कोण?-    तीन राज्यांच्या मुखाशी असलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयातील या बस स्थानकाची ही दुरवस्था पाहता त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आहेत. -    पाच कोटी रुपये खर्चून या बस स्थानकाची उभारणी करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र गेल्या २ वर्षांपासून हे कामच ठप्प आहे.  पायाभरणीपर्यंतचे बांधकाम झाल्यानंतर पुढचे बांधकाम अचानक थांबले आहे. त्यासाठी निधीची कमतरता असल्याचे सांगितले जाते. -    भाजप पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कार्यकाळात निधीची व्यवस्था करूनच बांधकाम सुरू करण्यात आले होते. मग, अचानक निधीची कमतरता कशी पडली, पुरेसा निधी  का दिल्या जात नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

झाडाखाली बसून पाहतात बसची वाट

या बसस्थानकाच्या परिसरात प्रवाशांसाठी सध्या ना बसण्याची व्यवस्था आहे, ना सुसज्ज स्वच्छतागृहे बनवण्यात आली आहेत. प्रवाशांच्या संख्येनुसार आसन व्यवस्थाही केलेली नाही. अशात दररोज सिरोंचात दाखल होणाऱ्या राज्य आणि आंतरराज्यीय बसेसमधून दररोज येणाऱ्या एक हजार प्रवाशांचे हाल होत आहे. 

प्रवाशांना नाईलाजाने झाडाच्या सावलीत बसून बसची वाट पाहावी लागत आहे. जुन्या बसस्थानकाच्या इमारतीत प्रवाशांना बसण्याची सोय आहे, मात्र बसेस तिकडे येतच नसल्याने झाडांच्या सावलीत थांबणे प्रवाशी पसंत करत आहेत.

 

टॅग्स :state transportएसटी