गौरव : चामोर्शीत क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण चामोर्शी : तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलन २०१६-१७ चे पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत तीन दिवसीय क्रीडा व कला स्पर्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुधोली रिठ येथे घेण्यात आल्या. यात कबड्डी स्पर्धेत घोट व मक्केपल्ली केंद्राने मुला-मुलींच्या गटाने प्रथम क्रमांक पटकाविला. या क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण जि. प. सदस्य डॉ. तामदेव दुधबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच शेवंताबाई कुसनाके, बुधाजी गोंगले, सोनू देवतळे, मिलींद देवतळे, बाबुराव देव्हारे, रामदास कुसनाके, शब्बीर खॉ पठाण, राकेश देवतळे, संजय देवतळे, गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे, ज्येष्ठ भाग शिक्षणाधिकारी एम. एम. अलोणे, एम. बी. कडते, के. बी. डोर्लीकर, केंद्रप्रमुख एस. एच. खेवले, मुख्याध्यापक जी. के. मेश्राम तथा तालुक्यातील १४ केंद्रातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, पदाधिकारी व सर्व केंद्रातील नागरिक उपस्थित होते. यावेळी पालकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत घोट व मक्केपल्ली केंद्र प्रथम
By admin | Updated: December 22, 2016 02:22 IST