लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशोत्सवातून विद्यार्थी व पालकांचा कल शिक्षणाकडे वाढवायचा आहे. शिक्षण विभागाच्या सर्व योजनांचा लाभ देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शिक्षकांनी भर द्यावा, असे आवाहन देसाईगंजचे गटशिक्षणाधिकारी डॉ.पीतांबर कोडापे यांनी केले.बुधवारी देसाईगंज येथील गटसाधन केंद्रात तालुक्यातील सर्व शिक्षकांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. सदर सभेत शाळांचे नियोजन कसे असावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गटसमन्वयक ब्रम्हानंद उईके, केंद्रप्रमुख विजय बन्सोड, विवेक बुद्धे, विषय साधन व्यक्ती अरविंद घुटके, रामकृष्ण रहांगडाले, राजेंद्र बांगरे, एच.के.सहारे, ठाकूर आदी उपस्थित होते.याप्रसंगी शाळेच्या पहिल्या दिवशी माध्यान्ह भोजनात गोड जेवण देणे, मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वितरित करणे, आरटीई नियमाचे काटेकोर पालन करणे, कृतीयुक्त अध्यापनावर भर देणे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.
शिक्षकांनो, गुणवत्तेवर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:03 IST
सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशोत्सवातून विद्यार्थी व पालकांचा कल शिक्षणाकडे वाढवायचा आहे. शिक्षण विभागाच्या सर्व योजनांचा लाभ देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शिक्षकांनी भर द्यावा, असे आवाहन देसाईगंजचे गटशिक्षणाधिकारी डॉ.पीतांबर कोडापे यांनी केले.
शिक्षकांनो, गुणवत्तेवर भर द्या
ठळक मुद्देगटशिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन : वडसाच्या गटसाधन केंद्रात सभा