गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका ३० एप्रिल २०१५ रोजी घेण्यात आल्या. या निवडणुकीच्या कामासाठी अनेक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. शिक्षकांनी प्रामाणिकपणे निवडणुकीचे काम केले. मात्र या निवडणुकीच्या कामाचे मानधन अद्यापही मिळाले नाही. यासंदर्भात प्रशासनाकडे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने निवडणूक कामाचे शिक्षकांचे थकीत मानधन तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय कोमेरवार, तालुकाध्यक्ष संतोष सुरावार, झाडे, मनबत्तुलवार, नैताम आदींसह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या तालुका कार्यकारिणीचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. ग्राम पंचायत निवडणुकीचे काम केलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे थकीत मानधन तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचेकडे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)
शिक्षकांचे निवडणूक कामाचे मानधन थकले
By admin | Updated: September 10, 2015 01:31 IST