शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

दिल्लीतील पर्यटनस्थळे बघून थक्क झाली तनिष्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:30 IST

लोकमतच्या ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमांतर्गत हवाई सफरसाठी गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोलीच्या कारमेल हायस्कूलची आठव्या वर्गाची विद्यार्थिनी तनिष्का विवेकानंद चांदेकर हिची निवड झाली होती.

ठळक मुद्देलोकमत संस्कारांचे मोती : नागपूर ते दिल्लीपर्यंतची हवाई सफर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकमतच्या ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमांतर्गत हवाई सफरसाठी गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोलीच्या कारमेल हायस्कूलची आठव्या वर्गाची विद्यार्थिनी तनिष्का विवेकानंद चांदेकर हिची निवड झाली होती. तनिष्काने महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांसोबत दिल्लीतील अनेक प्रेक्षणीय स्थळांना २६ जून रोजी भेट दिली. ही स्थळे बघून तनिष्का थक्क झाली. लोकमतच्या पुढाकाराने विमान प्रवासाचा आनंद लुटता आल्याने तिने लोकमतचे आभार मानले आहे. संस्काराचे मोती हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला असून विविध प्रकारचे सामान्य ज्ञान, अनेक बक्षीसे मिळण्यासोबतच दिल्लीच्या हवाई सफरची संधी मिळते. त्यामुळे यावर्षीही आपण यात सहभागी होणार असल्याचे तनिष्का म्हणाली.हवाई सफर करून आलेल्या तनिष्काने सांगितले की, यापूर्वी मी विमानतळ बघितले होते. मात्र प्रत्यक्ष विमानाने प्रवास केला नव्हता. लोकमतच्या हवाई सफरअंतर्गत आपली निवड झाल्याचे कळताच आपल्याला खूप आनंद झाला. नागपूर ते दिल्लीपर्यंतच्या विमानातील प्रवासाची मजा काही औरच होती. दिल्ली येथील संसद भवन, इंडिया गेट, रेल्वे म्युझिअम, लाल किल्ला आदी स्थळांना भेटी दिल्या. या स्थळांची माहिती जाणून घेतली. आम्ही संसद भवनाजवळ असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या वाहनाने संसदेबाहेर जात होते. त्यावेळी वाहनातून त्यांनी या मुलांना हात दाखवून त्यांच्या भेटीचे स्वागत केले.पंतप्रधान मोदी यांना मी दररोज टीव्हीवर बघते, मात्र त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा योग लाभल्याने मी अतिशय आनंदी झाली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संजय धोत्रे यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा केली. लोकमतमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या इतर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधता आला. त्यांची संस्कृती, शैक्षणिक वातावरण याबाबतही चर्चा करता आली. सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेला प्रवास रात्री १० वाजता संपला. दिवसभरातील या प्रवासात घेतलेल्या मजेचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया तनिष्काने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.