अहेरी : दुहेरी हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या ३ फेब्रुवारीपासून स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या महिलांच्या उपोषणाची ९ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या आश्वासनानंतर सांगता झाली. गीता गजानन सोनटक्के, सखुबाई सखराम इजगमकर यांनी उपोषण सुरू केले होते. उपोषण मंडपास पालकमंत्री ना. आत्राम यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक ढवळे यांच्याकडून तपास काढून उपविभागीय पोलीस अधिकारी धुमाळ यांच्याकडे तपासाची सुत्रे दिली. तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश ना. आत्राम यांनी दिले. यानंतर पालकमंत्री ना. आत्राम यांनी उपोषणकर्त्यांना लिंबुपाणी पाजून उपोषणाची सांगता केली. यावेळी बाबुराव कोहळे, विनोद अकनपल्लीवार, प्रशांत नामेवार, सुभाष घुटे, जयप्रकाश शेंडे, समुद्रलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी धुमाळ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता
By admin | Updated: February 11, 2015 02:05 IST