शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

जिल्हाभरातील तलाठी आंदोलनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:28 AM

विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील तलाठ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. पुरवठा विभागाची स्वतंत्र आकृतीबंद असताना महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना पुरवठा विभागात नियमबाह्यपणे पदोन्नती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देशासकीय कामे ठप्प : १९ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील तलाठ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.पुरवठा विभागाची स्वतंत्र आकृतीबंद असताना महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना पुरवठा विभागात नियमबाह्यपणे पदोन्नती देण्यात आली आहे. याची चौकशी करावी, १२ व २४ वर्ष सेवा झालेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ द्यावा. मंडळ अधिकारी संवर्गाच्या गोपनीय अहवालाच्या नस्ती आस्थापन शाखेतून गहाळ झाल्याबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी. तलाठ्यांचे स्थायीकरणाचे आदेश द्यावेत. तलाठ्यांच्या उपविभागाबाहेर विनंती बदल्या कराव्या. अतिरिक्त साजाचा कार्यभार असलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना अतिरिक्त सादील भत्ता व मेहनताना द्यावा. मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, परस्पर अदलाबदलीच्या कालबाह्य धोरणाची अंमलबजावणी थांबवावी. सेवा ज्येष्ठता यादी विहीत कालावधीत प्रसिद्ध करावी. व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल मीडियाद्वारे दिलेले अतितत्काळ आदेश पाळणे बंधनकारक करू नये. कोतवालांचे आदेश तलाठी कार्यालयात करताना परत न झालेल्या कोतवालांच्याबाबत तहसीलदार यांच्या प्रमाणपत्राची योग्य चौकशी करावी. जमिनविषयीची बरीच माहिती आॅनलाईन आहे. निवडणूक, नैसर्गिक आपत्ती या कामाव्यतिरिक्त इतर शासकीय कामे सुट्टीच्या दिवशी व रात्री करण्यासाठी सक्ती करू नये. कोणत्याही विभागाची कामे पटवारी, मंडळ अधिकारी वर्गावर लादली जातात. ती कामे ज्या विभागाशी संबंधित आहेत, त्यांच्याकडून त्यांचा आढावा घ्यावा. फेरफारच्या नोंद एक महिन्याच्या आत निकाली काढण्याची सक्ती करू नये, मेघा कुळमेथे यांची पदस्थाना त्यांच्या मूळ पदावर आसरअल्ली येथे तलाठी म्हणून करावी आदी मागण्यांसाठी तलाठी आंदोलन करीत आहेत. सदर आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू आहे.टप्प्यानुसार सुरू आहे तलाठ्यांचे आंदोलनतलाठ्यांच्या मागण्या सोडवाव्या, यासाठी विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने यापूर्वी अनेकवेळा आंदोलने करून निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे २ व ३ आॅगस्ट रोजी जिल्हाभरातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी काळ्याफिती लावून काम केले. ५ आॅगस्ट रोजी सामूहिक रजा टाकून उपविभागस्तरावर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. ६ आॅगस्टपासून ८ आॅगस्टपर्यंत शेतकºयांची सर्व कामे केली जात आहेत. मात्र शासकीय कामे बंद ठेवण्यात आली आहेत. १३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल. त्यानंतरही शासनाने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास १९ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कार्यालयाच्या चाव्या अधिकाºयांकडे सोपवून बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

टॅग्स :Strikeसंप