शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीनिमित्त रताळ्यांनी खाल्ला भाव, दर गेले शंभरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:23 IST

Gadchiroli : या भागात होते रताळ्यांचे उत्पादन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाशिवरात्री सणानिमित्त बाजारात रताळ्यांची आवक झाली. मात्र, ही आवक फारशी नव्हती. महाशिवरात्रीच्या पर्वावर रताळे खरेदीची लगबग दिसून आली. शनिवारी शहरातील बाजारपेठेत रताळ्यांना १०० रूपये किलो दर होता. आज रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात ८० रूपये किलो दराने रताळ्यांची विक्री सुरू होती.

दोन दिवसांवर आलेल्या महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत: उपवासाच्या पदार्थांना मागणी होती. रताळे, फळांसह साबूदाणा, शेंगदाणे, राजगिरा लाडू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू होती. दुसरीकडे, भाज्यांचे दर स्थिर होते तर कलिंगड, द्राक्षांसाठी गर्दी होती. बटाट्याचे दर स्थिर होते. प्रतिकिलो ३० रूपयांप्रमाणे बटाट्यांची विक्री आठवडी बाजारात सुरू होती. चंद्रपूर जिल्हयाच्या सिंदेवाही तालुक्यातून शहराच्या बाजारपेठेत गेल्या चार दिवसांपासून रताळ्यांची आवक होत आहे. विक्रेत्यांनी विक्रेत्यांनी परजिल्हयांतून रताळ्यांची मागणी किरकोळ विक्रीसाठी केली.

या भागात होते रताळ्यांचे उत्पादनगडचिरोली जिल्हयात आरमोरी तालुक्यात रताळ्यांचे उत्पादन होते. कोसरी, मानापूर तसेच वैरागडच्या परिसरात शेतकरी रताळ्यांचे उत्पादन घेतात. गडचिरोलीच्या आठवडी बाजारात याच भागातून रताळ्यांची आवक झाली.

"शनिवारला ८० ते १०० रूपये किलो दराने रताळ्यांची विक्री केली. आठवडी बाजारात ७० रूपये किलो दराने रताळे विकत आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर उपवासाला खाण्यासाठी रताळे अनेकजण खरेदी करीत आहेत."- चंद्रशेखर मेश्राम, विक्रेते, गडचिरोली

टॅग्स :foodअन्नInflationमहागाईGadchiroliगडचिरोली