अहेरी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने १८ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात विविध आजारांच्या २५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तर १५ रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत पुढील उपचार व शस्त्रक्रियेकरिता इतरत्र पाठविण्यात आले. शिबिरात नाक, कान, घसा आजाराचे ४९ रुग्ण, दंतचिकित्सेचे २०५, डोळ्यांचे १११ तर ५९ स्त्री रुग्ण, सोनोग्राफीचे ३१, लघु शस्त्रक्रिया ८२, १० ईसीजी रुग्ण, १०० क्षयरोग, १० कर्करोग, मधुमेह व रक्तदाबाच्या २०० रुग्णांना औषधोपचार करण्यात आले. यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, डॉ. अनंत कुंभारे, डॉ. गुरू खोब्रागडे, डॉ. किलनाके, डॉ. गुलवाडे, डॉ. प्रसन्ना मद्दीवार, डॉ. जुमडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ. शिवराम कुंभरे, डॉ. आर. एल. हकीम, डॉ. खंडारे, डॉ. सोयाम, डॉ. वड्डे, डॉ. भगत, डॉ. गेडाम आदींनी रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली. १ हजार ५४० हून अधिक रुग्णांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. (तालुका प्रतिनिधी)
अहेरी येथे २५ रुग्णांवर शस्त्रक्रिया
By admin | Updated: March 23, 2015 01:21 IST