शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
2
IPL 2025: दोन दिग्गजांचे होणार संघात 'कमबॅक'; PBKS vs RCB सामन्याची वाढणार चुरस
3
'PoK मधील लोक आपले आहेत, किती दिवस दूर राहतील...', राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
4
"वैष्णवी हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तुल"; पोलिसांना फोन आला, अन्...
5
आयटेलचा ए ९० : परवडणाऱ्या किंमतीतील AI आयवाना असलेला स्मार्टफोन, कसा आहे; फिचर्स काय...
6
Corona Virus : चिंता वाढतेय! देशात कोरोना हात-पाय पसरतोय; रुग्णांची संख्या १२०० पार, १२ जणांचा मृत्यू
7
विकली जाणार Castrol कंपनी, रिलायन्सपासून सौदी अरामकोपर्यंत घेताहेत इंटरेस्ट; जाणून घ्या
8
IPL 2025: २५०० हून जास्त जवान, ६५ अधिकारी अन् मॉकड्रिल... पंजाब-RCB सामन्यासाठी चोख बंदोबस्त
9
हृदयद्रावक! मीटिंगमध्ये जोरात खोकला, घाम आला... अधिकाऱ्याने हार्ट अटॅकने जीव गमावला
10
यशने सुरु केलं 'रामायण'चं शूट, आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शकासोबतचे सेटवरील फोटो व्हायरल
11
देशातील एकमेव मंदिर, इथे भाविक देवाकडे करतात मृत्यूची मागणी, अशी आहे आख्यायिका
12
प्राची पिसाट प्रकरण मिटवण्यासाठी सायबर क्राइमने केला फोन, पण सुदेश म्हशिलकर यांनी केलं असं काही की...
13
हनिमूनला गेलेलं कपल अजूनही बेपत्ता; ड्रोनच्या मदतीने घेतला जातोय शोध; काय आहे हे प्रकरण?
14
'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ६ वर्षांनी घरी पाळणा हलणार
15
अमिताभ बच्चन यांची अयोध्येत मोठी गुंतवणूक; खरेदी केला 40 कोटी रुपयांचा भूखंड...
16
प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नी आणि सासूविरोधात केली पोलिसात तक्रार, प्रकरण नेमकं काय?
17
Jyoti Malhotra : "पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा?
18
"अभिमान वाटतोय की माझे काका...", पद्मश्री पुरस्कारानंतर अशोकमामांना विमानात मिळालं खास सरप्राइज
19
Post Office मध्ये RD सुरू केली असेल तर करू नका 'ही' चूक, २.७% पर्यंत कमी होऊ शकतं व्याज
20
लातूर: ट्रॅव्हल्स बसचा उदगीरकडे जाताना पहाटेच्या वेळी अपघात, दोन ठार, ३४ जण जखमी

नागरिकांच्या सहकार्याने निवडणूक तणावमुक्त करण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

यावेळी डीआयजी रंजन म्हणाले, आमचे जवान जरी बाहेरचे असले तरी आम्ही जिथे जातो त्या भागाला आपलं समजून काम करतो. त्यामुळेच आमचे जवान कोणत्याही आदेशाची वाट न पाहता लोकांच्या कोणत्याही अडचणीत धावून जातात. नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोणत्या गावात कशाची गरज आहे याची माहिती आम्ही ग्रामसभांकडून घेऊन त्यांना त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत.

ठळक मुद्देडीआयजी रंजन यांचे प्रतिपादन : सीआरपीएफची सेवा आपलेपणातून

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षानंतर एवढी शांत आणि तणावमुक्त वातावरणात विधानसभा निवडणूक पार पडली. जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले अशी भावना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक मानस रंजन यांनी व्यक्त केली. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सीआरपीएफकडून नक्षलविरोधी अभियानासोबतच राबविल्या जाणाऱ्या इतर उपक्रमांची माहिती दिली.यावेळी डीआयजी रंजन म्हणाले, आमचे जवान जरी बाहेरचे असले तरी आम्ही जिथे जातो त्या भागाला आपलं समजून काम करतो. त्यामुळेच आमचे जवान कोणत्याही आदेशाची वाट न पाहता लोकांच्या कोणत्याही अडचणीत धावून जातात. नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोणत्या गावात कशाची गरज आहे याची माहिती आम्ही ग्रामसभांकडून घेऊन त्यांना त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. या जिल्ह्यात सर्वाधिक समस्या रोजगाराची आहे. त्यामुळे आम्ही विविध माध्यमांतून युवकांना स्वयंरोजगार देऊन आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यांना काहीच येत नाही त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षणही दिले जात आहे. आतापर्यंत तलाव खोलीकरण, नवीन हातपंप, सोलर लाईट, शिवणयंत्रांचे वाटप, कुक्कुटपालन व्यवसायासाठी हातभार अशी अनेक कामे सीआरपीएफने या जिल्ह्यात केली असून आम्ही येथे आहे तोपर्यंत ती पुढेही सुरू राहतील असे डीआयजी रंजन म्हणाले. यावेळी सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट जियाऊ सिंह, उपकमांडंट कैलास गंगावने हे उपस्थित होते.शेजारच्या राज्यामुळे नक्षलवाद जिवंतगडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद बराच कमी झाला असला तरी शेजारच्या राज्यांमध्ये तो टिकून आहे. त्याची झळ या जिल्ह्याला बसत असल्याचे यावेळी डीआयजी रंजन म्हणाले, पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांची शिबिरे लागायची. अनेक दिवस त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असायचा. आता ती स्थिती नाही. नक्षलवाद्यांना एक दिवसही गावाजवळ राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुढील काही काळात या जिल्ह्यातून नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Policeपोलिस