याेवळी विशेष अतिथी उपसरपंच रामचंद्र बामणकर, ग्रा.पं. सदस्य फुलाबाई मडावी, सुरेखा वनकर, मंगला मडावी, कमलाबाई मडावी, संतोष मडावी, गीता बामनकार, सचिव आय. एम. बारसागडे व गावातील नागरिक अभ्यासक मुले, मुली उपस्थित होते.
चार वर्षापूर्वी ग्रामपंचायत ईल्लूर अंतर्गत मुले व मुलींसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली होती. ती अभ्यासिका सुव्यवस्थित सुरू असून ग्रामपंचायत ईल्लूर एक पाऊल पुढे टाकत मुलींसाठी विशेष अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव आय. एम. बारसागडे यांनी केले तर संचालन नीलेश वाय. कुंदावार यांनी केले. कार्यक्रमासाठी सुनील मडावी, अतुल बोरकुटे, रूपेश चांदेकर, सूरज गलबले, अक्षय बोरकुटे, नितेश देठे, जगदीश कपाट, पत्रू सातर, विनायक नारनवरे, अक्षता लांबाडे, निशा कपाट, पल्लवी पातर, मीना पातर, स्नेहल ठाकूर, सानिका दुर्गे, स्नेहा नारनवरे इत्यादींनी सहकार्य केले.