शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पोर्ला येथे बससाठी विद्यार्थ्यांचा महामार्गावर ठिय्या, वाहतूक ठप्प : पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:22 IST

पोर्ला परिसरातून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी आरमोरी व देऊळगावकडे शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र, बस नियमित न थांबल्याने विद्यार्थ्यांना तासन्‌तास रस्त्यावर प्रतीक्षा करावी लागत आहे.

गडचिरोली : बससेवा व बसथांब्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यात किटाळी येथे झालेल्या आंदोलनानंतरही प्रत्यक्षात कोणताही बदल न झाल्याने २३ डिसेंबर रोजी पोर्ला (ता. गडचिरोली) येथे  आरमोरी महामार्गावर शाळकरी विद्यार्थ्यांनी चक्काजाम आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. दुतर्फा वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले.

पोर्ला परिसरातून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी आरमोरी व देऊळगावकडे शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र, बस नियमित न थांबल्याने विद्यार्थ्यांना तासन्‌तास रस्त्यावर प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी शाळा-महाविद्यालयीन वर्ग बुडत असून परीक्षेच्या काळात शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला. शिवाय या परिसरात वाघाचीही दहशत आहे.

आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्यांशी चर्चा करून बससेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चक्काजाम मागे घेण्यात आले.

किटाळी आंदोलनाची आठवण

किटाळी येथे विद्यार्थ्यांनी बसथांब्यासाठी १७ डिसेंबर रोजी महामार्ग रोखला होता. प्रशासनाने तातडीने बस थांबविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक गावांत आजही बस न थांबण्याचीच स्थिती आहे. त्यामुळे पोर्ला येथील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

English
हिंदी सारांश
Web Title : Students Block Highway in Porla Demanding Bus Service, Traffic Halt

Web Summary : Students in Porla blocked the Armori highway demanding regular bus service and stops after unfulfilled promises. The protest caused a five-kilometer traffic jam, disrupting commuters. Authorities intervened, assuring improved bus services to resolve the situation.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली