शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचे पेपर सोडवले जंगलात बसून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 05:35 IST

गोंडवाना विद्यापीठातील सावळागोंधळ; नेटवर्कसाठी गडचिरोलीचे विद्यार्थी थेट छत्तीसगड सीमेवर

लिकेश अंबादेलोकमत न्यूज नेटवर्ककोरची (जि. गडचिरोली) : आधीच इंटरनेटचे कमजोर सिग्नल व त्यातही अचानक आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे गोंडवाना विद्यापीठाची मोबाइलवर ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांची चांगलीच फजिती झाली. काहींनी गोंदिया जिल्ह्याच्या सीमेत जाऊन तर काहींनी नेटवर्कच्या शोधात थेट छत्तीसगढ सीमेपर्यंत धाव घेत पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला. काही विद्यार्थ्यांना तर नेटवर्क उपलब्ध न झाल्याने पेपर सोडवण्यापासून वंचित राहावे लागले.

गोंडवाना विद्यापीठाच्या बीएस्सी आणि बीए या पदवी अभ्यासक्रमाची सध्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. पण कोरचीत दोन दिवसांपासून मोबाइल नेटवर्कच नव्हते. परिणामी, सोमवारी पेपर सोडविण्यासाठी नेटवर्क मिळवताना विद्यार्थ्यांना रानावनात भटकंती करावी लागली. नेटवर्कचा शोध घेत विद्यार्थी भटकताना दिसले. काहींनी २५ ते ३० किमी अंतरावरील गोंदिया जिल्ह्यातील चिचगड, तर काहींनी छत्तीसगड सीमेवरील गावाजवळ जाऊन पेपर सोडविण्याचा प्रयत्न केला. 

कोरची तालुका निर्मितीपासून या तालुक्यात फक्त बीएसएनएलचे नेटवर्क आहे. बहुतेकदा ते सापडतच नाही. येथील दूरसंचार विभागात एकही जबाबदार अधिकारी नाही. एका चौकीदाराच्या भरवशावर गेल्या अनेक वर्षांपासून सेवा दिली जात आहे.  कोरची तालुक्यातील नेटवर्कची जोडणी भंडारा जिल्ह्यातून आहे. तिकडे रस्त्याच्या कामामुळे बिघाड निर्माण होऊन दोन दिवस नेटवर्क प्रॉब्लेम निर्माण झाला होता, तो आता दुरुस्त झाला आहे, असे बीएसएनएलचे सहायक महाव्यवस्थापक जे. एफ. खुराणा यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाहीnऑनलाइन पेपर सोडवताना तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी प्राचार्यांमार्फत विद्यापीठाला त्वरित कळवावे. त्यांचा पेपर पुन्हा घेण्याची व्यवस्था केली जाईल, असे विद्यापीठाचे परिपत्रकच आहे. nतांत्रिक कारणामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी सांगितले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीexamपरीक्षा