शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:28 IST

सोनार समाज हा संपूर्ण देशात विखुरलेला व अल्प समाज आहे. सोनार समाजातील विद्यार्थी थोडेफार शिक्षण घेतल्यानंतर आपल्या परंपरागत व्यवसाय व कारागिरीकडे वळतात. आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने सोनार समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास धरून प्रशासकीय सेवेकडे वळावे, ......

ठळक मुद्देसतीश चौधरी यांचे आवाहन : आरमोरीत संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : सोनार समाज हा संपूर्ण देशात विखुरलेला व अल्प समाज आहे. सोनार समाजातील विद्यार्थी थोडेफार शिक्षण घेतल्यानंतर आपल्या परंपरागत व्यवसाय व कारागिरीकडे वळतात. आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने सोनार समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास धरून प्रशासकीय सेवेकडे वळावे, असे आवाहन आरमोरी नगर पालिकेचे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी केले.सोनार समाज शाखा आरमोरीच्या वतीने स्थानिक साई दामोधर मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीपदवार वट्टे होते. तर उद्घाटक म्हणून परिवर्तन पॅनलचे जिल्हा प्रमुख चंदू बेहरे होते. प्रमुख अतिथी म्हणून भामरागड पं.स.चे संवर्ग विकास अधिकारी मदन काळबांधे, सोनार समाजाचे माजी अध्यक्ष प्रकाश बेहरे, गिरीधर काळबांधे, राजेश्वर फाये, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष विजय खरवडे, उपाध्यक्ष दीपक बेहरे, सोनार समाजाचे अध्यक्ष पंकज खरवडे, उपाध्यक्ष दिलीप श्रीरंगे, रूपेश गजपुरे आदी उपस्थित होते.यावेळी चंदू बेहरे म्हणाले, राजकीय पातळीवर सोनार समाजाची शक्ती दाखविण्यासाठी सोनार समाजातील सर्व पोटशाखांनी एकत्र येण्याची गरज आहे. सोनार समाजातील महिलांनी चूल व मूल या संकल्पनेला तिलांजली देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. सोनार समाजाच्या ऐक्यासाठी समाज बांधवांनी संघटीत होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. प्राचार्य वट्टे यांनी मार्गदर्शन केले.तत्पूर्वी श्रीराम मंदिर देवस्थानातून संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गावरून फिरवल्यानंतर मंगल कार्यालयात समारोप करण्यात आला. त्यानंतर भजन, किर्तन व गोपालकाल्याचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज खरवडे, संचालन अजय काळबांधे यांनी केले तर आभार राहूल इनकने यांनी मानले.यशस्वीतेसाठी हरीहर काळबांधे, संतोष करंडे, मंगेश बांगरे, अभिषेक बेहरे, शुभम इनकने, राकेश गजपुरे, तुषार खापरे, कुणाल भरणे, वामन साखरे, दिलीप इनकने, विनोद बेहरे, अक्षय बेहरे, शिवनाथ झरकर, आशिष मस्के, अरविंद डुंबरे, अमन गजापुरे, सचिन फाये आदींनी सहकार्य केले.स्पर्धेतील विजेत्यांचा गौरवनरहरी महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून सोनार समाजाच्या वतीने महिलांसाठी रांगोळी, वक्तृत्व, संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या. रांगोळी स्पर्धेत सविता खापरे प्रथम, रश्मी खरवडे द्वितीय तर ज्योती मस्के यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. संगीत खुर्ची स्पर्धे पुनम गजपुरे प्रथम, भूमिका खरवडे द्वितीय तर सुनिता गजापुरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. संगीता खुर्चीमध्ये पुरूष गटातून प्रफुल खापरे, शुभम इनकने, मंगेश बांगरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. मुलींच्या संगीत खुर्ची स्पर्धेत दिव्या खरवडे, वेदांत भरणे, श्रुती करंडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची खरवडे, द्वितीय क्रमांक सविता खापरे यांनी पटकाविला. या सर्व विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण